माता न तू वैरिणी ! मस्तीखोर मुलीची आईनेच केली हत्या


माता न तू वैरिणी ! मस्तीखोर मुलीची आईनेच केली हत्या
SHARES

पोटच्या तीन वर्षीय मुलीची हत्या करून तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा बनाव करून तेथून पळ काढणाऱ्या आरोपी आईचा शोध शिवाजीनगरचे पोलिस घेत आहेत. हत्या करण्यात आलेल्या मुलीचं नाव चांदनी शेख असून याप्रकणी पोलिस तिची आई नद्राचा शोध घेत आहेत.


का केली हत्या?

शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी महिला नद्रा शेख ही तिचा पती, पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांचा मुलगी चांदनी यांच्यासह राहात होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून नद्रा आपल्या घरातल्यांवर वैतागायची. तिचे नवऱ्याशी अनेकदा वाद होत. दरम्यान बुधवारी मुलगी चांदनीच्या एका कृत्यामुळे वैतागलेल्या नद्राने तिला बेदम मारलं. या मारहाणीत चांदनी जागीच बेशुद्ध पडली. या प्रकारानंतर घाबरलेल्या नद्राने पोलिस आता बेड्या ठोकणार या भीतीने मुलगी आजारी असल्याचा बहाणा करत तिला राजावाडी रुग्णालयात आणले. रुग्णालयात तपासणीदरम्यान चांदनीकडून उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यावेळी नद्राने चांदनीला दोन तीन दिवसंपासून असा त्रास होत असल्याचं सांगितलं. त्यावर डॉक्टरांनी चांदनीवर उपचार सुरू असलेल्या पेपरची मागणी केली. मात्र पेपर घरीच राहिले असल्याचं सांगून नद्राने पळ काढला. ती परत आलीच नाही. त्यामुळे डॉक्टरांनी घडलेला प्रकार पोलिसांच्या कानावर घातला.


नद्रा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल

पोलिसांनी नद्राच्या कुटुंबियांकडे विचारपूस केली असता. तिचा नवरा बिहारला त्याच्या मूळ गावी असल्याचं पुढे आलं. डॉक्टरांनी चांदनीचं शवविच्छेदन केल्यानंतर तिचा मृत्यू आजारपणामुळे नाही, तर आईने केलल्या मारहाणीत झाल्याचं पुढे आलं. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी नद्रा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिस तिचा घेत असल्यची माहिती पोलिसांना दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा