मुलाच्या रडण्याला वैतागून आईनंच केली मुलाची हत्या


मुलाच्या रडण्याला वैतागून आईनंच केली मुलाची हत्या
SHARES

भिवंडीत एका जन्मदात्या आईनेचं ६ महिन्यांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या सततच्या रडण्यामुळं या पाषाणहृदयी आईने मुलाला नाल्यातील पाण्यात बुडवून त्याची हत्या केली. कल्पना नीलेश गायकर (२५) असं या महिलेच नाव असून मृत मुलाचं नाव ऋषभ (६ महिने) असं आहे. ही महिला भिवंडीतील धापसीपाडा परिसरात राहणारी आहे.


'असं' आलं सत्य बाहेर

कल्पनाचा मुलगा ऋषभ याचा मृत्यू बुधवारी झाला होता. तसंच कल्पना हिने ऋषभचा मृत्यू अपघाती झाल्याचं सर्वांना भासवलं होतं. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर ऋषभला पाण्यात बुडवून मारल्याचं समोर आलं. त्यावेळी पोलिसांनी कल्पनाची चौकशी केली असता तिनेच ऋषभची हत्या केल्याची कबुली दिली.


कारण काय?

ऋषभ सतत आजारी पडायचा आणि सतत रडायचा. त्याचप्रमाणं कल्पनाही सतत आजरी पडत असल्यानं वैतागून तिने ऋषभला नाल्याच्या पाण्यात बुडवून मारल्याची कबुली भिवंडी पोलिसांना दिली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.



हेही वाचा-

मुंबई विमानतळावर ४५७ ग्रॅम कोकीन जप्त

दारूच्या नशेत तोल गेल्याने सहाव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा