SHARE

दारूच्या नशेत असताना तोल गेल्याने सहाव्या मजल्यावरून पडून एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी वाकोला इथं घडली. तेजस अभयकांत दुबे असं या व्यक्तीचं नाव असून मित्राच्या घरी थांबला असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मद्यपानानं केला घात

मूळचा पुण्याला राहणारा तेजस कार्यालयीन कामानिमित्त बेल्जियमला गेला होते. शुक्रवारी सकाळी बेल्जियमहून १५ तासांचा प्रवास करून परतलेला तेजत खूपच थकला होता. त्यामुळे त्यानं सांताक्रूझ पूर्वेला कोलावरी व्हिलेजच्या सी. के. आर्च इमारतीच्या सहाव्या माळ्यावर भाड्याने राहत असलेला मित्र राहुल सिन्हाच्या घरी थांबणं पसंत केलं. थकवा दूर करण्यासाठी दोघांनी मद्यपान केलं. याच मद्यपानानं त्याचा घात केला.


संध्याकाळची घटना

दारूच्या नशेत तेजस गॅलरीत गेला, मात्र गॅलरीला कोणतीही तटबंदी नव्हती. नशेत त्यांचा तोल गेल्याने तो सहाव्या मजल्यावरून खाली पडला. सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडल्यामुळे इमारतीबाहेर बघ्यांनी गर्दी केली. सुरक्षारक्षकानं या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर वाकोला पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेजसचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलासचंद्रा आव्हाड यांनी दिली.


हेही वाचा -

कोण आहे कट्टर हिंदुत्ववादी वैभव राऊत?

ब्राऊन शुगरच्या तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्यासंबंधित विषय
ताज्या बातम्या