कोण आहे कट्टर हिंदुत्ववादी वैभव राऊत?


कोण आहे कट्टर हिंदुत्ववादी वैभव राऊत?
SHARES

राज्यात घातपात घडवण्याचा कट रचण्याच्या तयारीत असलेल्या वैभव राऊतला गुरुवारी रात्री नालासोपारा येथून अटक करण्यात अाल्यानं खळबळ उडाली अाहे. वैभव राऊतच्या घरातून अाठ देशी बाॅम्ब जप्त करण्यात अाले अाहेत. वैभव राऊत हा सनातन संस्थेशी निगडित अाहे तसेच तो कट्टर हिंदुत्ववादी असल्याच्या चर्चेला उत अाला अाहे. पण वैभव राऊत हा नक्की कोण अाहे, हे अाम्ही तुम्हाला सांगणार अाहोत.


कट्टर हिंदुत्ववादी

नालासोपारा येथील भंडारअाळीमधील तीन माळ्याच्या इमारतीत वैभव दुसऱ्या माळ्यावर राहत होता. तर पहिल्या माळ्यावर तो नागरिकांना हिंदुत्वाबद्दल मार्गदर्शन करायचा. नालासोपारा परिसरात धर्मांतराचे अनेक गैरप्रकार वैभवनं उघडकीस आणले होते. त्यावरून त्या परिसरातील परिस्थिती अनेकदा चिघळली होती. अनेकदा बकरी ईद दरम्यान गौहत्येवरून त्याने बकरे नेणाऱ्यांच्या गाड्या अडवल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊन चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कलेक्टर आणि नालासोपारा पोलिसांनी सीआरपीसी १४४ नुसार कायदा हातात घेणे, चिंताजनक परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अनेकदा नोटीस वैभव राऊतला पाठवल्या आहेत.


सनातन संस्थेशीही संबंध

सहा वर्षांपूर्वी वैभव सनातन संस्थेशी जोडला गेला. वैभवच्या हिंदुत्ववादी वागण्यामुळे नालासोपारा परिसरात कायम तणावाचे वातावरण रहायचे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी कलेक्टर व नालासोपारा पोलिसांकडून वैभव राऊतला यापूर्वी अनेकदा नोटीस पाठवल्याचे पुढे आले आहे.


शरदला मिळवून दिले भाड्याचे घर

एटीएसच्या कारवाईत पकडण्यात अालेल्या शरद कळसकर यालाही वैभवने अापल्या अोळखीवर नालासोपाऱ्यात भाड्याने घर मिळवून दिले होते. पंडित विजय जोशी यांच्या घरात शदर भाड्यानं राहत होता. विजय जोशी हे ज्योतिष म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे ते नागरिकांची कुंडली अाणि हात पाहण्यासाठी या खोलीत जात असत. गुरुवारी सकाळी विजय जोशी अापल्या खोलीवर गेले असता, त्यांना खोलीच्या टाळ्याला सील लावलेले दिसले. शरदला पोलिसांनी पकडून नेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. शरदची अोळख वैभवनेच करून दिल्याचे विजय जोशी यांनी सांगितले. या घटनेशी माझा काहीही संबंध नसून पोलिसांनी चौकशीत पूर्ण सहकार्य करण्यास मी तयार असल्याचेही ते म्हणाले.


हेही वाचा -

नालासोपाऱ्यासह, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये होता घातपाताचा डाव!

आता तरी सनातन संस्थेवर बंदी येणार का?

नालासोपाऱ्यात 8 देशी बॉम्ब जप्त, मुंबई एटीएसची कारवाई



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा