मुंबई विमानतळावर ४५७ ग्रॅम कोकीन जप्त


मुंबई विमानतळावर ४५७ ग्रॅम कोकीन जप्त
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्यागिक सुरक्षा बला (सीआयएसएफ)च्या जवानांनी एका ब्रिझिलीयन नागरिकाला ४५७ ग्रॅम कोकीनसह अटक केली. या आरोपीचं नाव एफ. नास्कीमेन असं आहे. तो अदिदास अबाबा या शहरातून भारतात दाखल झाला होता. तो दिल्लीत राहायला आहे.


२.५ कोटी किंमत

एक प्रवासी मुंबई विमानतळावर संशयास्पदरितीने वावरताना पाहिल्यावर 'सीआयएसएफ'च्या जवानांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याच्या सामानाची चौकशी केल्यावर त्याच्याकडे ४५७ ग्रॅम कोकीन हा अंमली पदार्थ आढळून आला.



हे कोकीन कॅप्सूलच्या स्वरूपात असून ते प्लास्टिकमध्ये बांधून त्याने टाल्कम पावडरच्या डब्यात लपवून ठेवले होते. या कोकीनची अंदाजे किंमत २.५ कोटी रुपये इतकी असल्याचं म्हटलं जात आहे. 'सीआयएसएफ'च्या जवानांनी त्याला मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात दिलं आहे.


६० किलो हर्बल ड्रग्ज

याआधी देखील मुंबई विमानतळावर ६० किलो हर्बल ड्रग्जसह इथोपियन नागरिकाला अटक करण्यात आली होती. मोहम्मद हमजा अबदी (२३) असं या आरोपीचं नाव होतं. मोहम्मद हा केनियातील स्थानिक प्राधिकरणाची प्रमाणपत्रे सादर करून हर्बल ड्रग्ज मुंबईत आणण्याचा प्रयत्न करत होता. या हर्बल ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात दीड कोटीपेक्षा जास्त किंमत आहे.



हेही वाचा-

दारूच्या नशेत तोल गेल्याने सहाव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

गुंतवणुकदारांच्या ४००० कोटींच्या अपहारप्रकरणी दोघांना अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा