पैशांच्या वादातून नागपाड्यात महिलेची हत्या

एका वेश्यासोबत त्याची 400 रुपयांत बोलणी ठरली. त्यानुसार जितेंद्रने 500 रुपयांची नोट महिलेला दिली. माञ बाहेर पडताना वेश्या महिलेने उरलेले 100 रुपये न देता. जितेंद्रला कटवण्याचा प्रयत्न केला.

पैशांच्या वादातून नागपाड्यात महिलेची हत्या
SHARES

पैशाच्या वादातून नागपाडा परिसरात राहणाऱ्या एका तरूणाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. या हत्येचा अवघ्या 12 तासांमध्ये छडा लावत नागपाडा पोलिसांनी  जितेंद्र कुमार  या तरूणाला 28 वर्षीय तरुणाला जेरबंद केलं. या प्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. अवघ्या 100 रुपयांच्या देवाण घेवाणीतून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

  कॅटरिंगचा व्यवसाय असलेला जितेंद्र हा रविवारी रात्री दारूच्या नशेत नागपाड्यातील कामाठीपुरा येथे आला होता. एका वेश्यासोबत त्याची 400 रुपयांत बोलणी ठरली. त्यानुसार जितेंद्रने 500 रुपयांची नोट महिलेला दिली. माञ बाहेर पडताना वेश्या महिलेने उरलेले 100 रुपये न देता. जितेंद्रला कटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने उरलेले 100 रुपये परत मागितले. मात्र या वेश्येने 100 रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांत शाब्दिक वाद झाला. 

याच वादातून राग अनावर झालेल्या जितेंद्रने नशेत सोबत आणलेल्या चाकूने वेश्येवर हल्ला चढवला. त्यावेळी महिलेला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या एजंट पुढे  शहाबाज मर्चंट याच्यावरदेखील जितेंद्रने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वेश्या आणि शहाबाज मर्चंट हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले. दोघांना उपचारासाठी जे.जे रुग्णालयात नेले असता. मोठया प्रमाणात रक्तस्ञाव झाल्याने वेश्या महिलेला मृत घोषित केले. तर शहाबाज मर्चंट याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी जितेंद्रवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली.


संबंधित विषय