काळाने घातला मुलुंडमधल्या कुटुंबावर घाला

 Mulund
काळाने घातला मुलुंडमधल्या कुटुंबावर घाला

मुलुंड - पुणे-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 11 जण मृत्युमुखी पडले. तर 3 जण जखमी आहेत. जखमींवर पुण्यातल्या रुग्णालयात उपचार सरु आहेत. मृतांमधील 10 जण मुंबईमधील आहेत. या 10 जणांमध्येे मुलुंडमधल्या सहा जणांचा समावेश आहे. शनिवारी पहाटे पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या ज्योती ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या समोर अचानक रानडुक्कर आडवे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रानडुक्कराला उडवून दुभाजक ओलांडून ही बस पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला धडकली.

सज्जनवाडी येथील यशोप्रसाद सोसायटीमध्ये राहणारे जयवंत चव्हाण आणि योगिता चव्हाण हे पती पत्नी आणि आठवीत शिकणारी रेवती चव्हाण यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चव्हाण यांचा मुलगा हेरंब हा अभियांत्रिकी शिक्षण घेत असून तो कोल्हापूरमध्ये राहतो. 

वसई येथील रहिवासी जगदीश पंडित तसेच शैलजा पंडित यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. प्रदीप अवचट आणि सुलभा अवचट यांची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. हे सर्व जण खाजगी व्यावसायिक असल्याने एकमेकांस चांगले परिचित होते. हे सर्व शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. परंतु पुणे सोलापूर महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला.

Loading Comments