
मुंबईतील भांडुप परिसरात एका अंडर-कन्स्ट्रक्शन SRA इमारतीजवळ दुर्दैवी घटना घडली. उघड्या खड्ड्यात पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जण जवळच सुरू असलेल्या लग्न समारंभाला उपस्थित होते. दरम्यान काही जण चुकून बांधकामाच्या उघड्या खड्ड्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले इतर लोकही या घटनेत अडकले.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. Mumbai Fire Brigade च्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले.
या घटनेनंतर बांधकाम ठिकाणांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा
