५ वर्षीय मुलीचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू, धारावीतील धक्कादायक घटना

हुजैफा शेख हा लिफ्टमध्ये पूर्ण आत न जाता आतील लिफ्टची जाळी आणि बाहेरील जाळी यात अडकला. तेवढ्यात लिफ्ट वर जाण्यासाठी निघाली आणि त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

५ वर्षीय मुलीचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू, धारावीतील धक्कादायक घटना
SHARES

मुंबईच्या धारावी परिसरात एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघाताचे सीसीटिव्ही सर्वत्र वायरल होत असून या प्रकऱणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याचे कळते.

हेही वाचाः- राज्यात कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत कायम

धारावीतील क्रॉस रोड मधील कोझी शेल्टर इमारतीत ही घटना घडली आहे. हुजैफा शेख हा तळमजल्यावरुन सुमारे १२.४५ वाजता त्याच्या दोन बहिणींसोबत लिफ्टमध्ये चढला. मात्र  हुजैफा शेख हा लिफ्टमध्ये पूर्ण आत न जाता आतील लिफ्टची जाळी आणि बाहेरील जाळी यात अडकला. तेवढ्यात लिफ्ट वर जाण्यासाठी निघाली आणि त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. शेख सोबत एक बहिण सात वर्षाची तर दुसरी तीन वर्षाची होती. मात्र जेव्हा लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहचली तेव्हा त्या दोघी निघून गेल्या पण शेख हा बाहेर आलाच नाही. मृत्यू झालेल्या मुलाचे वडील हे गार्मेंट्स मध्ये काम करतात तर आई गृहीणी आहे.

या घटनेमुळे नागरिकांनी त्यांच्या मुलांना लिफ्टमधून एकटे जाण्यास देऊ नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे.  अपघाताच्या अर्ध्या तासानंतर शेख याच्या आईने त्याचा शोध घेतला असता त्यांना लिफ्टच्या येथे रक्त सांडलेले दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज नुसार, सहाव्या मजल्यावरचे बटण लाल रंगाचे होते. म्हणजेच सहाव्या मजल्यावर कोणीतरी लिफ्ट बोलावली होती.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा