मुंबई खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, सराईत दरोडेखोर अटकेत

चोरी करण्याठी कर्नाटक, तेलंगणा आणि हैद्राबाद यासारख्या राज्यात जाऊन चक्क मोबाईल शॉपी फोडत असल्याचं तपासात समोर आलंय.

मुंबई खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, सराईत दरोडेखोर अटकेत
SHARES

फिरायला जाण्यासाठी भाड्याने गाडी घेऊन विविध राज्यात घरफोडी, आणि दरोडे टाकणाऱ्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केलाय. पाचही आरोपी मुंबईतले असून खास चोरी करण्याठी कर्नाटक, तेलंगणा आणि हैद्राबाद यासारख्या राज्यात जाऊन चक्क मोबाईल शॉपी फोडत असल्याचं तपासात समोर आलंय. आरोपीनी मागच्या दोन महिन्यात लाखो रुपयांचे मुद्देमाल चोरले असल्याचं स्पष्ट झालय.

हेही वाचाः- गुड न्यूज! आता सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त

मुंबईतील टूर्स अँड ट्रॅवलिंगचा व्यवसाय असणाऱ्या सर्जेराव देशमुख यांच्याकडून आरोपी खास चोरीसाठी इनोव्हा कार भाड्याने घेत असल्याचा धक्कादायक खुलासा तपसामध्ये झालाय. या टोळीचा म्होरक्या फरहान मुमताज शेख याने इतर चौघांना स्वतःच्या हाताखाली ठेवून कित्येक राज्यातल्या अनेक मोबाईल शॉपी पळवल्या आहेत. व्हीव्हो, ओप्पो, एमआय,वन प्लस असे महागडे मोबाईल आरोपीनी चोरले होते..सीसीटीव्हीत दिसणारी ही इनोव्हा कार आरोपींनी भाड्याने घेतलीय. पुण्यातल्या कोथरूडमध्येही आरोपीनी चार दुकाने फोडल्याच समोर आलंय. आरोपींनी नोव्हेंबर महिन्यात हैद्राबादमधल्या एका मोबाईल शॉपीवरती  जबर दरोडा टाकून ११९ मोबाईल पळवले होते हैदराबाद पोलिसांनी तपासाला सुरुवात करताच आरोपींनी वापरलेली गाडी मुंबईची असून पाचही आरोपी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार मुंबई पोलिसांशी संपर्क करून हैदराबाद पोलिसांनी तपास करण्याची विनंती केली. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने पहिल्यांदा ही गाडी ज्या मालकाच्या नावावर आहे त्या सर्जेराव देशमुख या इसमाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याची गाडी आरोपी मोहम्मद तरबेज हा भाड्याने घेऊन गेला असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचाः- सर्वांसाठी लोकल पुढच्या वर्षातच? महापालिका आयुक्त म्हणाले...

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत सुर्वे, सुशील वंजारी, पोलीस उपनिरीक्षक विलास पवार यांच्यासहित पथकाने मुंबईतल्या विविध भागात आरोपींवर पाळत ठेवून त्यांचा शोध घेतला आणि अटक केली. सर्व आरोपींवर २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीय. या सर्व आरोपींना हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढचा तपास हैदराबाद पोलिस करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा