अवघडच आहे ! अनैतिक संबध ठेवण्यास नकार देणाऱ्याची प्रेयसीने दिली सुपारी

विशेष म्हणजे आरोपी महिला ही नामंकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजर आहे. तर प्रियकर हा पालिकेत सब-इंजिनीअर म्हणून काम करतो.

अवघडच आहे ! अनैतिक संबध ठेवण्यास नकार देणाऱ्याची प्रेयसीने दिली सुपारी
SHARES

मुंबईत अनैतिक संबध ठेवल्यावरून एकमोकांची हत्या केल्याचे आपण ऐकले असेल,  मात्र अनैतिक संबध ठेवण्यास नकार देण्यावरून प्रियकराचाच काटा काढण्यासाठी निघालेल्या प्रेयसीला वेळीच पोलिसांनी रोखले. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी एका तरुणीसह मारेकऱ्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला ही नामंकित बँकेच्या असिस्टंट मॅनेजर आहे. तर प्रियकर हा पालिकेत सब-इंजिनीअर म्हणून काम करतो.

हेही वाचाः- मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणी

आरोपी  महिला मुंबईतील नामांकित बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे, तर ज्याची सुपारी दिली होती, ती व्यक्ती पालिकेत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. इतकेच नाही तर ही सुपारी घेणारा तरुण हा बीएससी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. महिला असिस्टंट मॅनेजर आणि या इंजिनिअरचे अफेअर होते. मात्र इंजिनिअरनं प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला हे असाह्य झाल्यामुळे या महिलेनं त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला. ओडिशाचा रहिवासी बीएससीचा विद्यार्थी विजय प्रधान याला इंजिनिअरला मारण्यासाठी१ लाखांची सुपारी देण्यात आली होती. रविवारी आरोपी महिला आणि मारेकरी एकमेकांना भेटले आणि प्लॅन करून घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी या दोघांना घटनास्थळी अटक केली आणि या इंजिनिअरचे प्राण वाचवले.

हेही वाचाः- गृहमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट, चर्चांना उधाण

मुंबई पोलीस दलातील एसीपी भीमराव इंदलकर यांनी सांगितले की, पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळाली होती. माहिती मिळताच वेळ न गमावता त्यांनी घटनास्थळी पोहोचले आणि या दोघांना अटक केली. माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केल्याने इंजिनिअरचा जीव वाचला, मात्र आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. या महिलेला सुपारी किलरचा नंबर कोणी दिला आणि त्याच्याकडे बंदूक, गोळ्या कुठून आल्या, याचा तपास सुरू आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा