चेन्नई-मुंबई इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी

यासोबतच मुंबईतील हॉस्पीटल बॉम्बने उडवण्याची धमकीचा मेल देखील मंगळवारी आला होता.

चेन्नई-मुंबई इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी
SHARES

चेन्नईहून (Chennai) मुंबईला (Mumbai) जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास विमान मुंबईत सुरक्षित उतरले. विमान कंपनीच्या मुख्यालयात धमकीचा मेल आला होता.

इंडिगोने (Indigo) या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. इंडिगोने सांगितले की, 'चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 5149 ला बॉम्बची धमकी मिळाली होती. मुंबईत उतरल्यावर, क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमान एका विलगीकरण कक्षात नेण्यात आले. सर्व प्रवासी विमानातून सुखरूप उतरले आहेत. आम्ही सुरक्षा एजन्सीसोबत काम करत आहोत आणि सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान टर्मिनल परिसरात परत ठेवले जाईल. 

मेल मिळताच एअरलाइन्सने पोलिसांना अलर्ट केले. सुरक्षा पथक विमानतळावर पोहोचले. सीआयएसएफनेही पदभार स्वीकारला. पोलिसांनी इमारतीची झडती घेतली असता त्यांना काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे सांगितले.

मुंबईतील रुग्णालयांनाही धमक्या आल्या

अधिका-यांनी सांगितले की, धमकीनंतर सुरक्षा (Mumbai Police) वाढवण्यात आली आहे. याआधी मंगळवारी मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बची धमकी देणारा मेल आला होता.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाठवणाऱ्याने दावा केला आहे की, हॉस्पिटलच्या बेडखाली आणि बाथरूममध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. धमकीचा मेल मिळालेल्या हॉस्पिटलमध्ये मुंबईचे जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलचा समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, मेल पाठवण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर केला होता, जो बीबल डॉट कॉम नावाच्या वेबसाइटवरून पाठवला गेला होता. माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि बॉम्बशोधक पथकाने रुग्णालयांची झडती घेतली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.हेही वाचा

मुंबईतील रस्त्यांचे फक्त 15% कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजस्थानमधून एकाला अटक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा