इंटरनेटच्या मदतीने गांजाची तस्करी, प्रसिद्ध मिठाई विक्रेत्याच्या मुलासह एकाला अटक

डार्क नेटवरून हा गांजा मागवल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत साडे पाच लाख रुपये असून महाविद्यालयीन तरुणांना विक्री करायचे अशी माहिती पुढे आली आहे.

इंटरनेटच्या मदतीने गांजाची तस्करी, प्रसिद्ध मिठाई विक्रेत्याच्या मुलासह एकाला अटक
SHARES

डार्क नेटच्या माध्यमातून गांजा मागवून महाविद्यालयीन तरूणांना त्याची विक्री करणा-या दुकलीला गुन्हे शाखे ९ च्या पोलिसांनी अटक केली. इंटरनेटच्या मदतीने हे दोघे गांजाची विक्री करत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. फैज शकील भिवंडीवाला(३१) व आरिफ उस्मान मिठाईवाला(२२) अशी या दोघांची नावे आहेत.  अटक आरोपींमधील एक तरूण प्रसिद्ध मिठाई दुकानाच्या मालकाचा मुलगा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वांद्रे टर्नर रोड येथे गांजा घेण्यासाठी दोन व्यक्ती येणार असल्याची माहीति गुन्हे शाखेच्या कक्ष-९ चे सहाय्यक पोलिस निरीक सुधीर जाधव यांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने टर्नर रोड येथे सापळा रचून दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्याच्या तपासणीत २२४ ग्रॅम गांजा सापडला. आरोपीच्या चौकशीत टॉर व विकर मी या संकेतस्तळाच्या मदतीने डार्क नेटवरून हा गांजा मागवल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत साडे पाच लाख रुपये असून महाविद्यालयीन तरुणांना विक्री करायचे अशी माहिती पुढे आली आहे. आरोपींमधील आरीफ हा प्रसिद्ध मिठाई दुकानाच्या मालकाचा मुलगा आहे.

या प्रकरणात अन्य आरोपींचा ही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.  त्या अनुशंगाने पोलिस तपास करत आहे. या पूर्वी ही गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लाँकडाऊनमध्ये मास्कचा तसेच पीपीई किटचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती देत गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांचे कौतुक केले होते.

हेही वाचाः- धक्कादायक ! डोंगरीत अत्याचार करून ७ वर्षाच्या मुलीची हत्या

हेही वाचाः- मुंबईत लाँकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा