मुंबईत लाँकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा दाखल

सरकारने लाँकडाऊन पूर्णतहा न उठवता, हळूहळू लाँकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. मात्र, असे असले तरी सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या समारंभांना बंदी राज्य सरकारने बंदी घातली आहे.

मुंबईत लाँकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी नवरदेवासह ९ जणांवर गुन्हा दाखल
SHARES

कोरोना पसरु नये म्हणून बंदी आदेश असतानाही मालाडच्या मालवणी परिसरात लग्न मालकाने नवरदेवाची घोड्यावरून वरात काढली. त्या वरातीत मोठ्या प्रमाणात वऱ्हाड्यांनी गर्दीत केल्याने लग्नात विघ्न आलयं. लाँकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी लग्नमालक, नवरा आणि त्याच्या कुटुंबातील इतर ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  

हेही वाचाः- सुशांतनं आत्महत्येपूर्वी 'या' अभिनेत्याला केला होता फोन, पण...

मुंबई ही सध्या कोरोनाचे हाँटस्पाँट म्हणून ओळखली जात आहे. दिवसाला मुंबईत हजारो नवीन रुग्ण समोर येत असून या महामारीने मृत पावलेल्यांची संख्या ही लक्षणीय आहे. मात्र देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवणे ही तितकेच महत्वाचे असल्याने  सरकारने लाँकडाऊन पूर्णतहा न उठवता, हळूहळू  लाँकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. मात्र, असे असले तरी सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या समारंभांना बंदी राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यात ही लग्नसोहळे हे फक्त मोजक्या पाहुण्यात करण्यासाठी पोलिस परवानगी घेऊन करता येऊ शकतात. मात्र अनेक ठिकाणी नियमांचे उल्लघंन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचाः- मी ‘राजनिष्ठ’, राज ठाकरेंच्या वाढदिवसाला नांदगावकरांची भावनिक पोस्ट

मालाडच्या मालवणी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे.  पोलिस परवानगी शिवाय लग्न सोहळा आयोजीत करून गर्दी केल्याप्रकरणी  मालवणी पोलिसांनी नवरदेवासह १० जणांना अटक केली. नवरा,त्याचे वडील व इतर कुटुंबातील सदस्यांनी लग्न सोहळा  आयोजीत केला. तसेच त्यानंतर भर रस्त्यात वरात काढण्यात आली. १२ जूनला मालवणी येथील गेट क्रमांक १२ जवळ हा प्रकार घडला. परवानगी नसताना लॉकडाऊनमधील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शुक्रवारी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत झाला होता.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा