दी़ड किलो सोन्याचे लुटारू

 Masjid Bandar
दी़ड किलो सोन्याचे लुटारू
दी़ड किलो सोन्याचे लुटारू
दी़ड किलो सोन्याचे लुटारू
See all

मस्जिद बंदर - व्यापाराजवळी सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून दीड किलो सोन्याचे दागिने, दोन कार, एक मोटरसायकल असा एकूण 45 लाखांचा ऐवज जप्त केलाय. शहानवाज खान, जहांगीर शेख, प्रफुल्ल गायकवाड आणि रतन सिंग अशी या चौघांची नावं आहेत. या आरोपींना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घाऊक सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी असलेले मुकेशकुमार संघवी यांचे मिर्झा स्ट्रीटवर दुकान आहे. दुकानात बनवलेले साडेसहा किलो वजनाचे दागिने घेऊन ते वाराणसीला जाण्यासाठी निघाले. सीएसटी स्थानकात जाण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उभी असलेली टॅक्सी पकडली. टॅक्सी कर्नाक पुलाजवळ पोहचताच लघुशंकेचे कारण सांगून चालकाने टॅक्सी थांबवली. यावेळी टॅक्सीमध्ये घुसलेल्या चार लुटारूंनी संघवी यांच्याजवळी दागिन्यांनी भरलेली बॅग आणि गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.

Loading Comments