दीड कोटींची बनावट घड्याळं हस्तगत

मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट घड्याळं नामांकित कंपनीच्या नावाने विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा ४ च्या पोलिसांना मिळाली होती.

दीड कोटींची बनावट घड्याळं हस्तगत
SHARES

नामांकित कंपन्यांच्या बनावट घड्याळांची सोशल मिडियामार्फत विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा ४ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ही बनावट घड्याळं बनवणाऱ्या कारखान्याच्या मालकाला अटक केली आहे. हितेश प्रेमजी गडा (३८),कुंजन रमेश गडा (३१) अशी या आरोपींची नावे आहेत.  पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत १ कोटी ५० लाख रुपयांची हजारो घड्याळ हस्तगत केली आहेत.

मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट घड्याळं नामांकित कंपनीच्या नावाने विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा ४ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार  गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मेनन स्ट्रीट येथील रियल टाइम्स शाॅप नं ६ आणि डिवाइस कलेक्शन शाॅप नं २०१ या दोन दुकानांवर छापा टाकला. त्यावेळी पहिल्या दुकानातून १८०५ घड्याळं तर दुसऱ्या दुकानातून ६६९३ बनावट घड्याळं पोलिसांनी हस्तगत केली. 

ही घड्याळं खरी असल्याचे भासवून विविध बाजारात ती विकली जात असे. त्यामुळे संबंधीत कंपन्यांना याचा फटका बसत होता. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.हेही वाचा  -

पीएमसी बँक घोटाळा : आरोपी सुरजितसिंग, जाॅय थाॅमसला 'इतक्या' दिवसांची कोठडी

मोटरमनने वाचवले तरूणाचे प्राण
संबंधित विषय