Advertisement

मोटरमनने वाचवले तरूणाचे प्राण

मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या आसपास चुलबूल ट्रेनच्या मालडब्यातून प्रवास करत होता. यावेळी तो दरवाजाजवळ उभा होता. त्याच्या पायाजवळ इडलीचं भांडं होतं.

मोटरमनने वाचवले तरूणाचे प्राण
SHARES

ट्रेनमधून पडलेल्या तरूणाचे प्राण मोटरमनच्या सतर्कतेमुळे वाचले. मोटरमन गुमानी दास यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. 

मानखुर्दमध्ये राहणारा चुलबूल कुमार (१९) हा इडली विक्रेता आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या आसपास चुलबूल ट्रेनच्या मालडब्यातून प्रवास करत होता. यावेळी तो दरवाजाजवळ उभा होता. त्याच्या पायाजवळ इडलीचं भांडं होतं. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने अचानक त्याचा हात सुटला आणि तो ट्रेनमधून खाली पडला. यावेळी रेल्वे रुळांवर जखमी अवस्थेत पडलेल्या चुलबूलकडे पनवेल-सीएसएमटी ट्रेनचे मोटरमन गुमानी दास यांचं लक्ष गेलं. त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली. 

दास यांनी ट्रेनचे गार्ड डी. के. चौरासिया यांनी प्रवाशांच्या त्याला ट्रेनच्या डब्यात नेले. यावेळी तो बेशुद्ध झाला. दास यांनी मानखुर्द स्थानकावरील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना  कळवले. त्यांनी स्थानकावर रुग्णवाहिकेची सोय केली. त्यानंतर त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरूणाचे प्राण वाचवण्यात डाॅक्टरांनी यश आले. मोटरमन दास आणि गार्ड चौरासिया यांच्या या कामगिरीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली. रेल्वे प्रशासनातर्फे दोघांना गौरवण्यात येणार आहे. 


हेही वाचा -

गुंगीचे औषध देऊन डाॅक्टरचा विवाहितेवर बलात्कार

मुंबईत बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा