गुंगीचे औषध देऊन डाॅक्टरचा विवाहितेवर बलात्कार

वारंवार डाँक्टर विवाहितेशी जवळीकता साधायचा. त्यातूनच एक दिवशी डाँक्टरने विवाहितेला औषधांच्या जागी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. मात्र विवाहितेला त्याची जाणीवर झाली नाही.

गुंगीचे औषध देऊन डाॅक्टरचा विवाहितेवर बलात्कार
SHARES

मूल होत नसल्यामुळे औषधांच्या नावाखाली विवाहितेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करणाऱ्या डाॅक्टर विरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन चिळकर असे या डाॅक्टरचे नाव आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपी डाॅक्टरने वारंवार विवाहितेला ब्लॅकमेल करत, विविध पंचतारांकित हाॅटेलमध्ये बोलवून ही अत्याचार केल्याचे तक्रारत म्हटलं आहे.


पनवेलच्या कामोठे परिसरात राहणारी विवाहितेला मूल होत नसल्यामुळे तिचे वैवाहित जीवन त्रस्त होते. डाॅक्टरांच्या वैद्यकिय उपचाराने अनेकांना गुण आल्याने विवाहिता चिळकरकडे उपचारासाठी एप्रिल २०१८ मध्ये गेली होती. विवाहितेच्या साधेपणाचा फायदा घेऊन डाॅक्टरने तिचा विश्वास जिंकला. वारंवार डाॅक्टर विवाहितेशी जवळीकता साधायचा. त्यातूनच एक दिवशी डाॅक्टरने विवाहितेला औषधांच्या जागी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. मात्र विवाहितेला त्याची जाणीवर झाली नाही. त्यानंतर डाॅक्टरने अनेकदा पीडित महिलेला जुहू – सांताक्रूझ परिसरातील पंचतारांकित हाॅटेलमध्ये भेटायला बोलवायचा. तसेच विवाहितेला जेवणात गुंगीचे औषध देऊन तिला जेवणासाठी आग्रह करायचा. पीडित विवाहिता बेशुद्ध झाल्यानंतर डाँक्टर तिच्यावर अत्याचार करायचा.आपल्यासोबत डाॅक्टर उपचाराच्या नावाखाली चुकीचा प्रकार करत असल्याची जाणीव झाल्यानंतर पीडितेने जुहू पोलिस ठाण्यात डाॅक्टर विरोधात गुन्हा नोंदवला. मात्र गुन्हा घडलेले ठिकाण हे सांताक्रूझ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येत असल्यामुळे जुहू पोलिसांनी तो गुन्हा सांताक्रूझ पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस अधिक तपास करत आहेत. नुकतेच जोगेश्वरीत औषधांच्या नावाखाली महिला रुग्णाला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करणाऱ्या डाँक्टरचा मेघवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला होता.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा