पीएमसी बँक घोटाळा : आरोपी सुरजितसिंग, जाॅय थाॅमसला 'इतक्या' दिवसांची कोठडी

सुरजितसिंग आरोराला बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोराला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती.

पीएमसी बँक घोटाळा : आरोपी सुरजितसिंग, जाॅय थाॅमसला 'इतक्या' दिवसांची कोठडी
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) बँक घोटाळ्यातील आरोपी सुरजितसिंग आरोराला २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी जॉय थॉमसला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोघांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. 


गुन्हा दाखल झाल्यापासून कोणतेही समन्स पोलिसांकडून पाठवण्यात आले नाही. तसंच एकही कर्ज सुरजितसिंगने मंजूर केलेलं नाही. याशिवाय कागदपत्रे आरबीआयकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे फक्त ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करावी, अशी विनंती सुरजितसिंगच्या वकिलांनी केली. यावर न्यायालायने २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घोटाळाप्रकरणी राकेशकुमार वाधवान, सारंग वाधवान आणि वरियम सिंग या तीन आरोपींना उच्च न्यायालयाने २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 



हेही वाचा  -

पीएमसीच्या माजी संचालकाला अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा