पंचतारांकित हाँटेल्सना फसवणारे ठग पिता-पुत्र अटकेत

मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल्समध्ये भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेऊन पैसे न देताच पळ काढणाऱ्या ठग पिता-पुत्राला कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे.

पंचतारांकित हाँटेल्सना फसवणारे ठग पिता-पुत्र अटकेत
SHARES

मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल्समध्ये भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेऊन पैसे न देताच पळ काढणाऱ्या ठग पिता-पुत्राला कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. सुहास नेर्लेकर(५७) आणि स्वप्नील नेर्लेकर(३२) अशी या दोघांची नावं आहेत. या पिता-पुत्राने आजवर मुंबईतील बऱ्याच नांमकित हाॅटेल्सची फसवणूक केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


८ हजार ८८० रुपयांचं बिल

कांदिवलीच्या ठाकूर काॅम्पलेक्स जवळील सराफ चौधरी नगर परिसरात रहात असलेले सुहास हे व्यावसायिक आहेत. शनिवारी हे पिता-पुत्र दुपारच्या सुमारास 'व्हिवान्ता प्रेसिंडेट' हाॅटेलमध्ये आले. पत्नीही मागून येत असल्याचं सांगत त्यांनी तिच्यासाठी हाँटेलमधील कार बुक केली. या दोघांचं बिल ८ हजार ८८० रुपये झालं.


सुरक्षारक्षकाने रोखलं

चेक इन करण्यापूर्वी त्यांनी पुन्हा जेवणाची आॅर्डर दिली. जेवण झाल्यावर आपण रुममध्ये जात असून, त्यांनी बिल अॅड करण्यास सांगितलं. हॅाटेल व्यवस्थापनाची या दोघांवर बारीक नजर होती. दरम्यान दोघेही हॅटेलमधील रुममध्ये जाण्याऐवजी पळ काढत असल्याचं लक्षात आल्यानंतर सुरक्षारक्षक दिपक माणिक यांनी त्यांना रोखलं.


ताजला ३२ हजाराचा चुना

दोन्ही ठग पिता-पुत्रांची फसवेगिरी माणिक यांनी हाॅटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर पोलिसांना पाचरण करण्यात आलं. कफ परेड पोलिस ठाण्यात या दोघांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. या पूर्वी या दोघांनी कुलाब्याच्या ताज हॉटेलला तब्बल ३२ हजार रुपयांचा चुना लावला होता.


हेही वाचा

दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी निघालेल्या तरुणाला अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा