दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी निघालेल्या तरुणाला अटक

महाराष्ट्र (दहशतवाद विरोधी पथक) एटीएसच्या पोलिसांनी दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी आखाती देशात जाणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे.

SHARE

लातूरच्या उदगीर भागातून दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी निघालेल्या 30 वर्षीय तरुणाला महाराष्ट्र (दहशतवाद विरोधी पथक) एटीएसच्या पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. नरसिंग जयराम भूयकर उर्फ मोहम्मग रेहमान इब्नेआदम असं या आरोपीचे नाव आहे. दक्षिण अफ्रिका मार्गे हा तरुण पुढे आखाती देशात जाणार होता.

सोशल मीडियाद्वारे दहशतवाद्यांच्या संपर्कात?

मूळचा बिहारच्या बिदर जिल्हय़ातील जहिराबाद इथला रहिवाशी असलेला नरसिंग हा नोकरीसाठी लातूरला आला होता. उदगीरच्या एका बेकरीत तो कार्यरत होता. काही दिवसांपासून तो सोशल मिडियावर वारंवार असायचा. काही महिन्यांपासून तो मुस्लिम धार्मिक गोष्टींकडे वळला होता. त्याच्या सोशल मिडियावर ही तशा लिंक वारंवार येऊ लागल्या होत्या. यातूनच तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहशतवाद्यांनी त्याला वारंवार मुस्लिमांवर झालेल्या अन्यायांची माहिती पुरवून त्याचे मन वळवले होते. यातूनच त्यानं पुढे धर्मांतर करत मुस्लिम धर्म स्विकारला. त्यानंतर त्यानं त्याच्या सर्व कागदपत्रांवरील नावं ही बदलली. नव्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना येणाऱ्या अडचणी पाहून त्याने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून घेतलं. या सर्व कागदपत्रांच्या आधारे त्यानं बँकेत खातंही उघडलं होतं.

नावातील बनवाबनवी उघड

एका एजंटमार्फत पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज केला. यामध्ये त्यानं वडिलांचं नाव इब्नेआदम तर आईचं नाव मोहमद अकलियाबी अशी खोटी माहिती नमूद केली. पोलीस पडताळणीत अर्जात नमूद करण्यात आलेला पत्ता खोटा आढळला. नंतर एटीएसच्या पथकानं उदगीरमधील तो कार्यरत असलेल्या बेकरीवर जाऊन त्याला ताब्यात घेतलं. सोशल मडियावरून तो पहिल्यांदा अाफ्रिका आणि त्यानंतर आखाती देशातून दहशतवादी संघटनांची केंद्र असलेल्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती होती. या प्रकरणी एटीएसचे अधिकारी अधिक तपास करत आहेतहेही वाचा

टी.पी.राजाची हत्येतील आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

तरूणीवर अत्याचार करणारा अटकेत


संबंधित विषय
ताज्या बातम्या