तरूणीवर अत्याचार करणारा अटकेत

दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखूवन तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

तरूणीवर अत्याचार करणारा अटकेत
SHARES

नोकरी देण्याचे आमिष दाखूवन तिच्यावर जबरदस्ती करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कलीम खान असं या आरोपीचं नाव असून तो सध्य यलो गेट पोलिसांच्या ताब्यात आहे.


नेमकं प्रकरण काय?

गिरगावात राहणारी एक २३ वर्षीय मुलगी कामाच्या शोधात असताना अचानक एका मैत्रीणीनं तिला के.के. हेव्ही लिफ्टर कंपनीत नोकरी असल्याचं सांगितल. त्या मैत्रिणीनं पिडीत तरूणीला कंपनीचा फोन नंबरही दिला. त्यानंतर तिनं आरोपी कलीम खान याला फोन करून नोकरीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं. त्यावेळी दोघांच यलो गेट इथल्या भाऊचा धक्का परिसरात भेटाण्याच ठरलं. ठरल्याप्रमाणे पिडीत तरूणी यलो गेट परिसरात भेटण्यास आली


प्रतिकार करत  सुटका 

आरोपीनं तिला गाडीत बसण्यास सांगितलं. तरूणीनं नकार देताच आपण बाहेर भेटू असं त्याला सांगितलं. पण काहीतरी कारण देऊन त्यानं पिडीत तरूणीला गाडीत बसण्याचा आग्रह केला. गाडीत  बसल्यानंतर आरोपी कलीम खाननं तिला कार्यालयाजवळ नेत असल्याचं सांगत गाडी निर्जनस्थऴी उभी केली. त्यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्ती केली. वेळीच तरुणीनं मोठ्या हिॆमतीने खानला प्रतिकार करत स्वत:ची सुटका करून घेतली आणि पोलिसात तक्रार केली


पाठलाग करून  पकडलं

महिला पोलीस शिपाई पुष्पा गावित यांनी पाठलाग करून आरोपी खानला पकडलं. याप्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात खान विरोधात ३५४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस चौकशीत खानच्या मोबाइलमध्ये पीडित तरुणीचे फोटो ही आढळून आले. हे फोटो पीडित तरूणीच्या व्हाँट्स अॅप डिपीवरील असल्याचं त्यानं कबूल केलं



हेही वाचा -

कोकेन विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक

टी.पी.राजाची हत्येतील आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा