चित्रपटात गुंतवणुकीचं आमिष दाखवून फसवणारा अटकेत


चित्रपटात गुंतवणुकीचं आमिष दाखवून फसवणारा अटकेत
SHARES

चित्रपटात पैसे गुंतवल्यास काही महिन्यांतच गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला डीएननगर पोलिसांनी अटक केली आहे. संजय रविंद्र सुर्वे असं या आरोपीचं नाव असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


अशी केली फसवणूक

अंधेरी परिसरात राहणाऱ्या संजयने सध्या 'रिस्पेक वाय' या चित्रपटात पैसे गुंतवले होते. या चित्रपटाच्या निर्मीतीसाठी पैसे कमी पडत असल्यामुळे तो मागील अनेक दिवसांपासून फायनान्सरच्या शोधात होता. त्याचदरम्यान त्याची ओळखी योगेशकुमार लखनवाल याच्याशी झाली. याच ओळखीतून दोघे एकमेकांचे खास मित्र झाले. त्यावेळी संजयने योगेशला या चित्रपटात पैसे गुंतवल्यास चित्रपटातून मिळालेल्या पैशातून दुप्पट पैसे देण्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार योगेश हा पैसे देण्यास तयार झाला. त्यानुसार संजयने योगेशकुमारला डी. एन. नगर येथील बालाजी रेस्टोरंट येथे भेटायला बोलावलं. त्यावेळी संजयने तोंडात येईल त्या थापा मारून योगेशचा विश्वास जिंकला.


संधी साधून केली फसवणूक

योगेशने ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे संजयला भेटून पाच लाख रुपये चित्रपटात गुंतवण्यासाठी दिले. त्यानंतर संजयने योगेशला हाॅटेलमध्ये जेवणाची आॅर्डर देण्यासाठी पाठवलं. योगेश आॅर्डर देण्यासाठी गेल्यानंतर संजयने संधी साधून तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर योगेशने याप्रकरणी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानुसार डी.एन. गर पोलिसांनी संजयला विरारहून अटक करत त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा