परदेशातील नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका, नाहीतर 'असे' गंडवले जाल...


परदेशातील नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका, नाहीतर 'असे' गंडवले जाल...
SHARES

परदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवून हजारो तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीनं मुंबईसह, नवी मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातील तरुणांची फसवणूक केली आहे. गोरेगाव येथे पुन्हा एकदा नवीन जॉब रॅकेट सुरु करण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या अवळल्या.

कोट्यवधी रूपयांच्या या जॉब रॅकेट प्रकरणी पोलिसांनी अमित पाटोळे (३९), अमरदीप चौहान (२८), सर्फराज मोहम्मद अली शेख (४३) आणि अब्दुल सलाम गुलजार अहमद अंसारी (२९) या चौघांना अटक केली आहे.

अमित पाटोळे हा टोळीच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असून अमरदीप फोनवरुन तरुणांशी संवाद साधायचा, तर सर्फराज आणि अब्दुल हे दोघे ऑफिसात काम करायचे.



असे फसवायचे तरूणांना

ही टोळी एखाद्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये सुसज्ज ऑफिस विकत घ्यायची. त्यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान इ. सारख्या राज्यातील वृत्तपत्रांत परदेशातील नोकरीच्या जाहिराती द्यायची. नोकरीसाठी आलेल्या तरुणांकडून प्रत्येकी ४० हजार ते १ लाख रूपये उकळून त्या बदल्यात गरजू तरुणांचे पासपोर्ट घेऊन त्यांना टुरिस्ट वीजा द्यायची. काही दिवस मोठा गाजावाजा केल्यानंतर कुठलाही पुरावा मागे न साेडता ही टोळी अचानक पसार व्हायची.



कुठे कुठे फसवणूक ?

  • २०१४ साली अंधेरीत डेल्टा सोल्युशनच्या नावाखाली या टोळीनं तब्बल १८० तरुणांना १ कोटी १६ लाख रूपयांना फसवलं 
  • २०१५ साली कांदिवलीत ५०० बेरोजगरांना दीड कोटींना फसवलं 
  • नवी दिल्लीत ४६४ तरुणांना दीड कोटींना
  • उत्तर प्रदेशातील देवरिया येथे १५० तरुणांना
  • वाशीला देखील बऱ्याच तरुणांना या टोळीने फसवलं 

या टोळीचं कामकाज एवढ्या गुप्तपणे चाले की साथीदारांची नेमकी नाव काय आणि ते कुठे रहातात हे देखील इतरांना माहीत नसे. आतापर्यंत या टोळीकडून पोलिसांनी १० कम्प्युटर, सोनं आणि पैसे जप्त केले आहेत. या टोळीतील इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती परिमंडळ दहाचे पोलीस उप-आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.



हेही वाचा -

डॉ. अमरापूरकर मृत्यू प्रकरण, चौघांना अटक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा