मुक्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक


मुक्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक
SHARES

एमआयडीसी पोलिसांनी एका मुक्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ४० वर्षीय राजकुमार पांडे नावाच्या नराधमाला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे राजकुमारने या महिलेवर याआधी देखील हात टाकला होता, मात्र पीडित महिलेने घडलेला प्रकार कोणालाही न सांगितल्याने राजकुमारने पुन्हा एकदा तिचा विनयभंग केल्याचं समोर आलं आहे.


काय घडलं महिलेसोबत?

अंधेरी परिसरात राहाणारी ३३ वर्षीय महिला ही जन्मापासूनच मुकी आहे. ती एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते. ११ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे महिला आपल्या कामावर गेली होती. रात्री घरी आल्यावर मात्र ती अस्वस्थ असल्याचं आईला जाणवलं. आईने विचारलं असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. मी ब्युटीपार्लरमधून परतत असताना तुंगा हॉटेलजवळ एका अनोळखी इसमाने तिचा विनयभंग केला. महिलेने कसाबसा त्या नराधमाच्या तावडीतून सुटून पळ काढल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं. याच इसमाने महिन्याभरापूर्वीदेखील आपल्यासोबत असं कृत्य केल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं.

या सगळ्यानंतर मुलीच्या आईने थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. आपल्या तक्रारीत महिलेने राजकुमारचं वर्णन सांगत तो सायकलवरून तिथे येत असल्याचं देखील सांगितलं.


कसा सापडला आरोपी?

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपीच्या वर्णनावरून पोलिसांनी राजकुमार पांडेच्या मुसक्या आवळल्या. रविवारी त्याला कोर्टात हजार केलं, जिथे कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. विशेष म्हणजे, त्यानंतर आरोपीने जामिनासाठी केलेला अर्ज देखील कोर्टाने फेटाळून लावला. सध्या राजकुमार पांडेने आणखीन कोण्या महिलेचा विनयभंग केला आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.



हेही वाचा

लोकलपाठोपाठ मेट्रो स्थानकावरही महिलेचा विनयभंग


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा