लोकलपाठोपाठ मेट्रो स्थानकावरही महिलेचा विनयभंग


लोकलपाठोपाठ मेट्रो स्थानकावरही महिलेचा विनयभंग
SHARES

धावत्या ट्रेनमध्ये २३ वर्षीय तरूणीसमोर अश्लील चाळे करत तरूणीचा विनयभंग करण्याची घटना ताजी असतानाच आता मेट्रो स्थानकावरही महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर उभी असताना एका विकृताने आपल्यासमोर अश्लील चाळे केल्याचा आरोप करत एका महिलेने यासंबंधी 'मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लमिटेड' (एमएमओपीएल)कडे रितसर तक्रार नोंदवली आहे. या घटनेमुळे लोकलसह आता मेट्रोही महिला प्रवाशांसाठी सुरक्षित नसल्याची चर्चा होत आहे.


काय आहे प्रकरण?

गुरूवारी दुपारी ३.४५ वाजेच्या दरम्यान एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर ही घटना घडली. त्यानंतर पीडित महिलेने त्वरीत 'एमएमओपीएल'कडे लेखी तक्रार केली. त्यानुसार 'एमएमओपीएल'ने 'एमआयडीसी' पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार नोंदवल्याचं समजत आहे.

या तक्रारीनुसार पोलिसांनी एअरपोर्ट मेट्रो स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात ही घटना आणि विकृत व्यक्ती कैद झाली आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत असल्याचंही समजत आहे.

तक्रारदार महिला समोर आल्यास आम्ही तिला नक्कीच सहकार्य करू, अशी प्रतिक्रिया 'एमएमओपीएल'च्या वतीने देण्यात आली आहे.


पहिल्यांदाच अशी घटना!

मेट्रो- १ प्रकल्पात अत्याधुनिक सोयीसुविधांबरोबरच प्रवाशांच्या त्यातही महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात आल्याचा दावा 'एमएमओपीएल'कडून सुरूवातीपासूनच करण्यात येत आहे. प्रत्येक स्थानकावर सुरक्षा रक्षक, सीसीटीव्हीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. असं असतानाही गुरूवारी महिलेच्या विनयभंगाच्या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही आता एेरणीवर आला आहे. मेट्रो-१ ची सेवा सुरू होऊन तीन वर्षे उलटली असून अशी घटना पहिल्यांदाच घडल्याचे समोर आली आहे.



हेही वाचा -

धावत्या लोकलमधून मुलीची उडी: ४ दिवसानंतर आरोपी गजाआड

धावत्या लोकलवर दगडफेक, जखमी महिलेवर वन रुपी क्लिनिकमध्ये उपचार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा