गर्लफ्रेंडचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणं तरुणाला भोवलं


गर्लफ्रेंडचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणं तरुणाला भोवलं
SHARES

मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी २२ वर्षाच्या तरुणीला त्याच्या गर्लफ्रेंडचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी अटक केली आहे. शौविक भावन (२२) असं या तरुणाचं नाव असून तो बीएमएमच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.  

शौविकने आपल्या गर्लफ्रेंडचे तब्बल २० अश्लील फोटो इंस्टग्रॅमवर अपलोड केले होते. त्याने फोटोसोबत मुलीचा मोबाईल नंबर जोडत अश्लील कंमेंट केली होती.

उच्च शिक्षण घेणाऱ्या या मुलीला तिच्या मैत्रिणींनी तिच्या फोटोंबद्दल सांगितलं त्यानंतर मुलीने पोलिसांत धाव घेतली होती. दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर फोटो आणि नंबर व्हायरल झाल्याने रात्री अपरात्री तरुणीला फोन येऊ लागले होते. शौविकने मुलीला त्यांच्या प्रेमाचे खाजगी क्षण देखील त्यांच्या गावात व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी तापासाला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी शौविक मुलीला भेटण्यासाठी मुंबईला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. शौविक मुंबईला येताच त्याला अटक करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा