एकतर्फी प्रेमातून चिमुरड्यांचं अपहरण, पोलिसांनी केली सुखरूप सुटका


SHARE

मालवणी परिसरात एकतर्फी प्रेमातून महिलेच्या दोन लहान मुलाचं अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हे शाखाने इम्रान खान (३९ ) नावाच्या इसमाला शहाड येथून अटक करत दोन्ही मुलांची सुखरूप सुटका केली.


काय आहे प्रकरण?

पेशाने चालक असलेला इम्रान खान हा मालवणीतील आपल्या नातेवाईकांकडे वरचेवर येत असे, तिथेच त्याची ओळख एका महिलेसोबत झाली. ही महिला आपल्या नवऱ्यापासून वेगळी रहात असून तिला दोन मुले आहेत. इम्रानने या महिलेला लग्नाची मागणी घातली. मात्र तिने इम्रानचा प्रस्ताव फेटाळून लावला. 


'असा' आखला कट

तिनं नकार देऊनही इम्रान तिचा पाठलाग सोडला नाही. इम्राननं या महिलेच्या ५ आणि ७ वर्षीय मुलांच्या अपहरणाची योजना आखली. शनिवार ७ आॅक्टोबरला इम्रान या महिलेच्या घरी आला आणि मुलांना फिरायला घेऊन जातो, असं सांगून घेऊन गेला.

त्यानंतर त्यानं या महिलेला फोन करत "तुझी दोन्ही मुलं माझ्या ताब्यात असून, मुलं हवी असतील, तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल, असं बजावलं. धमकीचा फोन आल्यावर या महिलेनं क्षणाचाही विलंब न करता मालवणी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.    


'असा' सापडला तावडीत

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यानुसार इम्रान कल्याणजवळील शहाड येथे असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा कक्ष ११ चं पथक शहाडच्या दिशेने रवाना झालं. एका बाजरपेठेत पोलिसांना इम्रान दिसला; पण त्याच्या सोबत मुले नव्हती. 

त्यामुळे पोलिसांनी इम्रानवर पाळत ठेवली. या दरम्यान इम्रान एका लॉजमध्ये घुसला. त्याच्यापाठोपाठ कक्ष ११ चे अधिकारी देखील लॉजमध्ये घुसले आणि तिथून दोन्ही चिमुरड्यांची सुखरूप सुटका केली. सध्या दोन्ही चिमुरड्यांना त्यांच्या आईच्या ताब्यात देण्यात आलं असून इम्रानला गुन्हे शाखेने मालवणी पोलीस ठाण्याकडे सोपवलं आहे.हेही वाचा 

स्वत:च्याच अपहरणाचा बनाव आणि 50 लाखांची खंडणी!

पल्लवी पुरकायस्थचा मारेकरी दीड वर्षांनी गजाआड

खंडणीखोर तोतया पोलीस गजाआडडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय