मुंबईत १० लाखांची खंडणी घेताना RTI कार्यकर्ता अटकेत

आरटीआय कार्यकर्त्याला खंडणी उकळणाप्रकरणी अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत १० लाखांची खंडणी घेताना RTI कार्यकर्ता अटकेत
SHARES

आरटीआय कार्यकर्त्याला खंडणी उकळणाप्रकरणी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. बांधकाम कंत्राटदाराकडून १० लाखांची खंडणी उकळणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली. रमेश शहा असं या आरटीआय कार्यकर्त्याचं नाव असून, ही रक्कम घेताना शहा याला पकडण्यात आल्याचं समजतं. गुन्हे शाखा युनिट ९ च्या पथकाने ही कारवाई केली.

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे कंत्राटदाराला अंधेरी येथील कार्यालयाच्या कार्यालयाची भिंती, वनराई पोलीस वसाहत आणि तीन डोंगरी पोलीस वसाहतीचं नूतनीकरण हे काम देण्यात आलं होतं. हे काम सुरू करताच आरटीआय कार्यकर्ते रमेश शहा हे त्या ठिकाणी गेले. बांधकाम नित्कृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत शहा यानं काम थांबविण्यास सांगितलं.

हे कंत्राट कसे देण्यात आले, बांधकामात कोणते साहित्य वापरण्यात आले? याची माहिती मिळविण्यासाठी शहा यानं शासकीय कार्यालयात माहितीचा अर्ज केला. हा अर्ज मागे घेण्यासाठी शहा यानं कंत्राटदाराकडे १० लाखांची मागणी केली. १० लाख रूपये द्यायचे नसल्यानं या कंत्राटदारानं पोलिसांत तक्रार केली. त्यावरून डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला व १० लाखाची रक्कम स्वीकारताना शहा याला रंगेहाथ अटक केली. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा