टक्केवारीतली गुंतवणूक पडू शकते महागात, आर्थिक गुन्हे शाखेने केली दोघांना अटक

सुरूवातीचे काही दिवस पैसे मिळाले, पण त्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून शहा यांना गुंतवणूकीवर कोणतेही व्याज अथवा मुद्दल रक्कम मिळाली नाही.

टक्केवारीतली गुंतवणूक पडू शकते महागात, आर्थिक गुन्हे शाखेने केली दोघांना अटक
SHARES

गुंतवणूकीवर १२ टक्के परतावा देण्याचे  आमीष दाखवून २४१ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी नागरिकांनी गुंतवलेल्या पैशांवर ७६ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.  नागरिकांनी गुंतवणूकीसाठी दिलेले हे पैसे तिसऱ्या कंपनीत आरोपी व्याजावर गुंतवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचाः-  ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीचं तिकीट मिळणं दुर्दैवी

गोरेगावचे रहिवाशी असलेले राजेश शहा(४५) हे एका खासगी बँकेत उच्च पदावर काम करतात. माटुंगा येथील रमणीक हममुख असोसिएट या पार्टनरशिप फर्म दर महा १ ते १.०५ टक्क्यांनी गुंतवणूक स्वीकारत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ऑक्टोबर २०१६ मध्ये ते या कंपनीच्या माटुंगा येथील कार्यालयालात गेले होते. त्यावेळी तेथेही १ ते १.०५ टक्के दरमहा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच गुंतवणूकीची मुद्दल हवी असल्यास एक महिन्यात रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. ही रक्कम विविध व्यवसायात अधिक व्याज दराने गुंतवली जाते. त्यातून व्याज दिले जात असल्याचे शहा यांना सांगण्यात आले. त्यानंतर शहा यांनी या फर्मकडे ४८ लाख रुपयांची गुंतणूक केली. त्या बदल्यात त्यांना प्रॉमिसरी नोट देण्यात आली. त्यावर फर्मच्या संबंधीत व्यक्तींनीही स्वाक्षरी केल्या आहेत. सुरूवातीचे काही दिवस पैसे मिळाले, पण त्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून शहा यांना गुंतवणूकीवर कोणतेही व्याज अथवा मुद्दल रक्कम मिळाली नाही. 

हेही वाचाः-स्वयंसेवकांना लस चाचणीवेळी मृत्यू झाल्यास मिळणार १ कोटी

पैशांसाठी शहा यांनी कंपनीत तगादा लावला असता नोटबंदीमुळे व्यवसाय ठप्प असल्यामुळे देण्यास असमर्थता दर्शवली. वारंवार मागणी करूनही व्याज व मुद्दल न मिळाल्यामुळे अखेर शहा यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. शहा यांच्यासह आणखी ७७ व्यक्तींचेही पैसे व व्याज देण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले आहेत. हसमुख गोगारी व पंकज छेडा अशी अटक आरोपींची नावे असून ते रमणीक हसमुख असोसिएटचे सहभागिदार आहेत. त्यांच्याविरोधात ४०९, ४२०, १२०(ब) ३४ सह महाराष्ट्र ठेवीदार हक्क संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाळ करण्यात आला आहे. याप्रकरणी इतर आरोपींचाही पोलिस शोध घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा