Advertisement

स्वयंसेवकांचा लस चाचणीवेळी मृत्यू झाल्यास मिळणार १ कोटी


स्वयंसेवकांचा लस चाचणीवेळी मृत्यू झाल्यास मिळणार १ कोटी
SHARES

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनलॉकमुळं अनेक मुंबईकर घराबाहेर पडत असून, त्यामुळं रुग्णांची संख्या वाढत असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र असं असलं तरी मुंबईत कोरोनाच्या लशीची चाचणी सुरू झाली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ-अस्त्राझेनेकानं विकसित केलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ लशीची मुंबईत चाचणी सुरु झाली आहे. या चाचणीदरम्यान स्वयंसेवकांचा मृत्यू झाल्यास त्याला नुकसान भरपाई म्हणून १ कोटीची मदत केली जाणार आहे.

मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात शनिवारी तिघा स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आली. त्यांनतर, म्हणजे दुपारपर्यंत या तिघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. संपूर्ण भारतात निवडक १० केंद्रात १६०० स्वयंसेवकांवर या लशीचा प्रयोग केला जाणार आहे.

जीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आहे तसेच शरीरात अ‍ॅन्टिबॉडीज तयार झालेल्या नाहीत. अन्य कोणते आजार तसेच कोमॉर्बीड नसलेली सशक्त व्यक्तीच अशा चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत. कोव्हीशिल्ड’ चाचणीची घोषणा केली तेव्हा तात्काळ ३५० लोकांनी या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून आपली नावे नोंदविल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं.

एथिक्स समितीने काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यात चाचणी दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास अथवा आजारी पडल्यास त्याला विमा संरक्षण म्हणजेच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. समितीच्या सर्व आक्षेपांची पूर्तता करण्यात आली असून चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास १ कोटी रुपये भरपाई विम्याच्या माध्यमातून मिळणार आहे.

स्वयंसेवक आजारी पडल्यास ३८ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण असणार आहे. शनिवारी तिघा स्वयंसेवकांना लस देण्यात आल्यानंतर आणखी १० जणांची फिटनेस चाचणी करण्यात आली आहे. ज्या तिघांना लस देण्यात आली त्यांच्यावर नियमितपणे डॉक्टर लक्ष ठेवून राहाणार आहेत. तसंच, या तिघांना २९ व्या दिवशी दुसरा डोस देण्यात येणार आहे.

मुंबईतील नायर रुग्णालयातही या लशीची चाचणी होणार आहे. केईएममध्ये १६० स्वयंसेवकांवर चाचणी करण्याची परवानगी मिळाली असली तरी पहिल्या टप्प्यात १०० जणांवरच चाचणी केली जाणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा