मैत्रिणीच्या प्रियकराला धमकावण्यासाठी हवेत गोळीबार, दोघांना अटक


मैत्रिणीच्या प्रियकराला धमकावण्यासाठी हवेत गोळीबार, दोघांना अटक
SHARES

वर्सोवा परिसरात प्रेमभंग झालेल्या तरुणाने प्रेयसिच्या नव्या मित्राला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्या प्रकरणी अटक केली आहे. बंदुक खरी आहे हे भासवण्यासाठी त्याने दोन राऊड हवेतगोळीबार ही केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्ताफ हुसैन सय्यद (३६) आणि वसीम शेख, (३०) या दोघांना अटक केली आहे.

हेही वाचाः- मी जर तोंड उघडलं तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना देशाबाहेर जावं लागेल - संजय राऊत

वर्सोवा परिसरात राहणाऱ्या तरुणीचे अल्ताफवर प्रेम होते. अल्ताफ हा माहिम बिच परिसरात राहतो. मात्र वर्षभरापूर्वी त्याचे तरुणीसोबत भांडण झाल्यामुळे दोघे एकमेकांपासून दुरावले. मात्र नुकतीच त्याला त्याची मैत्रिण दुसऱ्याच तरुणासोबत फिरत असल्याचे कळाल्यानंतर त्याला राग अनावर झाला. याच रागातून त्याने मित्र वसीम शेख सोबत २६ डिसेंबर रोजी तरुणीसोबत फिरणाऱ्या मित्राचे घर गाठले. मात्र सुदैवाने तो कामानिमित्त लोनावळाला गेला होता. त्यावेळी अल्ताफने त्याच्या दोन्ही भावांना समज देण्यासाठी इमारतीखाली घेऊन गेला. त्यावेळी दोघां भावांवर त्याने देशी कट्टा रोखून धरत त्यांना घाबरवले. तसेच तो देशी कट्टा खरा आहे हे भासवण्यासाठी त्याने हवेत दोन राऊड फायरही केले. पुढे  त्याने दोघांना त्याचा भावाला त्या तरुणीपासून लांब राहण्याबाबत धमकावत तेथून निघून गेला.

हेही वाचाः- ईडीच्या कार्यालावर शिवसैनिकांनी लावलं भाजपा प्रदेश कार्यालयाचे पोस्टर

या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार वर्सोवा पोलिसांनी आरोपी  अल्ताफ हुसैन सय्यद (३६) आणि वसीम शेख, (३०) या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापण्यात आलेला देशी कट्टा ही जप्त केला आहे. हा कट्टा त्यांनी कुठून आणला, त्यांना कुणी दिला याची माहितीही वर्सोवा पोलिस घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा