थरारक! मरीनड्राइव्ह येथे भीषण अपघात, एकाचा मृत्यू, दोघ जखमी


थरारक!  मरीनड्राइव्ह येथे भीषण अपघात, एकाचा मृत्यू, दोघ जखमी
SHARES
मुंबईत कोरोनाच्या फैलावामुळे लाँकडाऊन सुरु असताना मरीनड्राइव्हच्या मोकळ्या रस्त्यांवर भरधाव वेगात गाडी चालवणे महागात पडले. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघं गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केलेली आहे.

नेफियन्सी रोडवरील उच्चभ्रूवस्तीत राहणारा आरेमन नागपाल त्याचे दोन मिञ शौर्यसिंग जैन आणि वेदांत पतोडीया हे नागपालच्या गाडीतून बाहेर फिरत होत. मंगळवारी ते मरीनड्राइव्ह येथे आले असताना, मोकळा रस्तापाहून नागपालगाडी भरधाव वेगात पळवत होता.  एका ठिकाणी त्याचे गाडीवरील नियंञण सुटले आणि त्याची गाडी पुढे जात असलेल्या खासगी बसला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की,नागपालच्या गाडीचा अक्षरशा चेंदामेंदा झाला होता. या भीषण अपघाताच्या आवाजाने त्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. 

स्थानिकांनी मोठ्या शर्तीचे प्रयत्नकरून गाडीचा दरवाजा उघडून त्या तिघांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 20 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिकांना दरवाजा उघडण्यात यश आले. तो पर्यंत घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी या तिघांना तातडीने हरीकिशनदार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माञ उपचारा दरम्यान डाँक्टरांनी नागपाल याला मृत घोषित केले. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत  असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शौर्यसिंग याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा