मुंबईत महिला आजही असुरक्षित


मुंबईत महिला आजही असुरक्षित
SHARES

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महिला सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून समोर आलं आहे. आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.


६ महिन्यांत ४०७ बलात्काराचे गुन्हे

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत या वर्षी अवघ्या ६ महिन्यांत ४०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून, ३४९ गुन्हे उघड झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरातून दिली आहे.


मुख्यमंत्र्यांनी केली माहिती उघड

मुंबईतून महिला, मुलींच्या अपहरणाचे ७८५ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ५७४ गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये छेडछाडीचे २५६ गुन्हे दाखल झाले असून, १३८ गुन्हे उघड झाले आहेत. तर विनयभंगाचे १ हजार २५७ गुन्हे दाखल केले असून यापैकी ९५४ गुन्हे उघड झाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

या सर्व गुन्हांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना जरी सरकारकडून केल्या जात असल्या तरी यावर अंकुश आणण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा