‘मुंबई लाइव्ह’चा दणका, पेट्रोल पंप सील


‘मुंबई लाइव्ह’चा दणका, पेट्रोल पंप सील
SHARES

चारकोप - पेट्रोल पंपावर होणाऱ्या घोटाळ्याच्या बातमी 'मुंबई लाइव्ह'ने दिल्यानंतर त्याची दखल घेण्यात आलीय. याप्रकरणी वैद्यमापन शास्त्र विभागाने लिगल मेट्रोलॉजी या पेट्रोल पंपाला सील ठोकले आहे.

काही दिवसांपूर्वी या पंपावर सुरू असलेल्या ग्राहकांच्या फसवणुकीविरोधात एमी शेठ नावाच्या मुलीने सोशल मीडियावर आवाज उठवला होता. ही बातमी 'मुंबई लाइव्ह'ने दाखवली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर वैद्यमापन शास्त्र विभागाने या पेट्रोल पंपाचा सर्व्हे केला, ज्यात त्यांना अनेक त्रुटी आढळल्या. "आम्ही या पेट्रोल पंपावरील चार डिस्पेन्सरची तपासणी केली. ज्यातील दोन नोझलवर परमिसिबल लिमिटपेक्षा कमी इंधन येत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली," अशी माहिती वैद्यमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी दिली. "कोणत्याही डिझेल किंवा पेट्रोल डिस्पेन्सरमधून प्रत्येक पाच लिटर इंधनावर 25 मिलीलिटर इंधन कमी येणे कायद्याने वैध्य आहे. मात्र त्याहून अधिक इंधन कमी आल्यास ते अवैध्य आहे. आम्ही तपासलेल्या चार डिस्पेन्सरपैकी एका पेट्रोल डिस्पेन्सरमधून प्रत्येकी पाच लिटर इंधनाला 30 मिलीलिटर आणि दुसऱ्या डिझेल डिस्पेन्सरला 35 मिलीलिटर तेल कमी आल्याने ही कारवाई केली," असेही अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे पुढे असे प्रकार रोखण्यासाठी वैद्यमापन शास्त्र विभागाच्या सर्व विभागांना आपापल्या कार्यक्षेत्रातील पेट्रोल पंपावर धाडी टाकण्याचे निर्देश दिले आले आहेत. याचा अहवाल 14 तारखेपर्यंत सादर करण्यास सांगितला आहे.

'मुंबई लाइव्ह'ने 1 मार्चला यासंदर्भातील बातमी दिली होती. एमी शेठ नावाच्या मुलीने फेसबुकवर पेट्रोल पंपच्या झोलचा खुलासा केला होता. एमीच्या बातमीची दखल 'मुंबई लाइव्ह'ने घेतली आणि अखेर याप्रकरणी कारवाई करण्यात आली.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा