मद्यधुंद अवस्थेत पोलिसाने हरवल्या बंदुकीतल्या ३० गोळ्या

वांद्रे पश्चिमेकडील ताज लॅडस एंड येथील बसस्टॉप समोर त्यांच्याकडून ही ३० गोळ्या असणारी बॅग हरवली.

मद्यधुंद अवस्थेत पोलिसाने हरवल्या बंदुकीतल्या ३० गोळ्या
SHARES

मुंबईतल्या नागरिकांसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या मुंबई पोलिसांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. मात्र एका मद्यपी पोलिस अधिकाऱ्यांमुळे  सर्वांची मान खाली गेली आहे. नशेच गस्तीवर असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने बंदुकीतील गोळ्या सार्वजनिक ठिकाणी विसरल्याने एकच खळबळ उडाली. अखेर स्थानिक पोलिसांच्या पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ती हरवलेली बॅग पोलिसांना सापडली. या प्रकरणी वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवली असून त्या मद्यपी कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी लावण्यात आली आहे.

मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले राजन धुळे आमदार भाई जगताप यांच्या सुरक्षेसाठी वांद्रेच्या कार्टररोड येथील निवासस्थानी निघाले होते. त्याच्याजवळ सरकारी पिस्तुल आणि तीस जिवंत काडतुसे असलेली बॅग होती. वांद्रे पश्चिमेकडील ताज लँडस एंड येथील बसस्टॉप समोर त्यांच्याकडून ही ३० गोळ्या असणारी बॅग हरवली. ही बाबदेखील त्यांना बऱ्याच वेळाने साधारण रात्री ९.४५ वाजता लक्षात आली त्यानंतर त्यांनी जवळच्या वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर वांद्रे पोलिसांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून तब्बल साडे पाच तास शोधाशोध केल्यावर अखेरीस ही बॅग सापडली

मिळालेल्या माहितीनुसार धुळे हे ऑन ड्युटी असताना दारू प्यायलेले होते. ताज लँड्स जवळच्याच बस डेपोसमोर बॅग बाजूला ठेवून धुळे बसले होते. नशेत बॅग विसरून ते तेथून निघून गेले.  दरम्यान, कर्तव्यावर असताना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी त्या पोलिसावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा