छोटा शकिलसह चार जणांवर मोक्का!


छोटा शकिलसह चार जणांवर मोक्का!
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्त छोटा शकिलसह चार जणांवर मुंबई पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दोन दिवसांपूर्वीत दादरच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात छोटा शकिल आणि त्याच्या हस्तकांविरोधात एका व्यावसायिकाने खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावेळी फोन करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द छोटा शकिलच असल्याचा दावा व्यावसायिकाच्या पत्नीने केला होता.


काय होती घटना?

काही दिवसांपूर्वी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाकडे या तिघांनी शकिलच्या सांगण्यावर बंदुकीच्या धाकावर ५ लाखांची खंडणी मागितली होती. भीतीपोटी व्यावसायिकाने खंडणीदेखील दिली. मात्र छोटा शकिलकडून वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीला घाबरून व्यावसायिकाने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीत व्यावसायिकाच्या पत्नीने स्वतः छोटा शकिलने फोन करून धमकावल्याचा दावा केला होता. त्यानंतर या गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला.


आरोपींना अटक

खंडणी विरोधी पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली. या तिघांच्या चौकशी वांद्र्यात राहणाऱ्या बिलाल शमसीचं नाव पुढे आलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला बिलालच शकिलचा खंडणीचा फोन पोहोचवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शकिलसह ओबेल अदिल, चाँद शेख, नुरानी खान, बिलाल शमसी यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यावसायिकाला आलेला फोन हा शकिलनेच केल्याचं तपासात पुढे आल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

छोटा शकिलचे तीन हस्तक अटकेत

स्वच्छतागृही असुरक्षीत, वाकोल्यात तरूणीचं अश्लील चित्रीकरण करणारा अटकेत


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा