साडीच्या दुकानात चोरी करणारे अटकेत

 Dahisar
साडीच्या दुकानात चोरी करणारे अटकेत

दहिसर - साडीच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी गुरुवारी राजस्थानमधून अटक केलीय. पोलिसांनी दोघांना दहिसर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. तीन महिन्यांपूर्वी या दोघांनी दहिसरमधल्या एका साडीच्या दुकानातून चोरी केली होती. दलपत भील आणि वसनाराम भील अशी या दोघांची नावे आहेत. बोरिवली स्टेशनवर दुकान मालकाने दोघांना साड्या घेऊन जाताना रंगेहाथ पकडले होते. पण त्यावेळी दोघांनी दुकान मालकाला चकवा देत राजस्थानला पलायन केले.

Loading Comments