अफगाण मधील चोरांचा मुंबईत सुळसुळाट

सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी कुलाबा परिसरातून एकूण चार अफगाणी तरुणांना ताब्यात घेतलंय.

अफगाण मधील चोरांचा मुंबईत सुळसुळाट
SHARES
अफगाण मधून भारतात येऊन आपली ओळख लपवून चोऱ्या करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांनी मुंबई पोलिसानी बेड्या ठोकल्यात आहेत. त्यांच्याकडून तब्बल साडेपाच लाखांचा चोरीचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आलाय. अटक आरोपी आपली ओळख लपवून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करत असल्याचं उघडकीस आलंय.


मुंबईतल्या डी.बी.मार्ग पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय.डी.बी.मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल आणि लॅपटॉप चोरीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले होते त्यानुसार पोलिसांचे पथक कामाला लागले..सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी कुलाबा  परिसरातून एकूण चार अफगाणी तरुणांना ताब्यात घेतलंय..यातल्या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात आले असून इतर दोघांची चौकशी सुरू आहे. दोघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय..जहाद जीन रहमानी (27) आणि जबिउल्लाह रोहानी (32) अशी यातल्या दोघांची नावे आहेत..


 ग्रांट रोड परिसरात राहणारे कुरियर कंपनीचे संचालक मनोज सुमय्या यांच्या दुकानातून 12 फेब्रुवारी रोजी 10 लॅपटॉप असणारा बॉक्स अचानकपणे चोरीला गेला होता त्यानुसार त्यांनी डी.बी.मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रार देऊन गुन्हा दाखल केला..पोलिसांनी पथकाच्या आधारे तपासाला सुरुवात केली आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बाहेरचे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता त्यानुसार परिसरात पाळत ठेवण्यात आली होती..मिळालेल्या माहितीनुसार 13 फेब्रुवारीला पोलिसांनी कुलाब्यातल्या बिस्टोरीया हॉटेलमध्ये धाड टाकली आणि एकूण चार जणांना ताब्यात घेतलं...


अटक करण्यात आलेले आरोपी हे मूळचे अफगानिस्तान मधले असून पासपोर्ट च्या आधारे महाराष्ट्रात आल्याचे स्पष्ट झालंय.. त्यांच्याविरोधात दिल्लीतल्या करोल बाग मध्ये आणि मुंबईतल्या पायधुनी पोलीस ठाण्यात चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून  वेगवेगळ्या कंपनीचे 50 मोबाईल आणि 10 लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेत..एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हसगत केलाय...त्यांच्याविरोधात भा.द. वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे..

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा