लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून महिलेला १७ लाखांचा गंडा

ईमेल आणि त्यानंतर व्हॉट्‌स ऍपवरून दोघे एकमेकांच्या वैचारिक दृष्या जवळ आले. त्यावेळी आरोपीने आपण मुंबईत येणार असल्याची तक्रारदार महिलेला सांगितले. त्यावेळी त्याने आपले बॅंक खाते बंद झाल्याचे सांगून आठ लाख आठ हजार रुपयांची मागणी केली.

लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून महिलेला १७ लाखांचा गंडा
SHARES

नामांकित लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून तरुणींना लक्ष्य करत, त्यांना लुबाडणाऱ्या एका तरुणाला सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. निखील कुमार सिंग असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणात पोलिस त्याच्या इतर दोन साथीदारांचा ही शोध घेत आहेत. नुकतीच निखिलने एका तरुणींला तब्बल १७ लाखांना गंडा घातला होता. या गुन्ह्यात सायबर पोलिस त्याच्या मागे होते.  


मदतीच्या नावाखाली उकळले पैसे

दादर परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेचे यापूर्वी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर पतीशी पटत नसल्यामुळे तिने त्याच्याकडून घटस्फोट घेतला होता. मे २०१८  मध्ये आरोपी निखिल घडस्फोटीत तक्रारदार महिलेच्या संपर्कात आला. त्यावेळी आरोपीने त्याचे नाव डॅनिज असून तो अमेरिकेत टेक्सासमध्ये अभियंता असल्याचं त्यानं महिलेला सांगितलं. त्यानंतर दोघांमध्ये बोलचाल सुरू झाली. सुरूवातीला ईमेल आणि त्यानंतर व्हॉट्‌स ऍपवरून दोघे एकमेकांच्या वैचारिक दृष्या जवळ आले.  त्यावेळी आरोपीने आपण मुंबईत येणार असल्याचे तक्रारदार महिलेला सांगितलं. त्यानंतर मुंबईत आला असल्याचं भासवून आरोपीनं महिलेला फोनवर आपले बॅंक खाते बंद झाल्याचं सांगत ८ लाखांची मागणी केली.  तसंच तिनं आरटीजीएसमार्फत ती रक्कम आरोपीला दिली.

त्यानंतर मित्राचा ऑस्ट्रेलियामध्ये अपघात झाल्याचं सांगत आणखी रक्कम मागितली. अशा पद्धतीनं आरोपीनं तक्रारदार महिलेकडून तब्बल १७ लाख उकळले.  काही तासांनी महिलेने आरोपीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपीचा दूरध्वनी बंद आढळला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित महिलेनं याप्रकरणी सायबर पोलिसांकडं तक्रार नोंदवली.


आरोपीला ठाण्यातून अटक

पोलिसांनी वस्तूस्थिती पडताळून अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस तपासात आरोपीने पाठवलेल्या ई-मेलच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्यावेळी संबधित ई-मेल खाते हे ठाण्यातून आँपरेट होत असल्याचं  निदर्शनास आलं. त्यानुसार पोलिसांनी निखिलला ठाण्यातून अटक केली.  तंत्रज्ञानामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आणखी दोन आरोपींचा यात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.



हेही वाचा -

प्रवाशांना बिस्किटातून गुंगीचं औषध देऊन लूट; दोघांना अटक

आता पोलिस ठाण्यातही भरणार जनता दरबार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा