ज्येष्ठ नागरिकांनो, असे तुमच्यासोबतही घडू शकते

 Govandi
ज्येष्ठ नागरिकांनो, असे तुमच्यासोबतही घडू शकते

तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँकेत जाऊन पैसे काढल्यानंतर ते मोजण्यासाठी एखद्या व्यक्तीला देत असाल किंवा एखादा व्यक्ती तुमचे पैसे मोजून देतो असे सांगत असेल तर जरा जपून. 

कारण पैसे मोजून देतो असे सांगून अनेक वृद्धांची लूट करणाऱ्या चोरट्याला गोवंडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. अमजत इराणी असे या आरोपीचे नाव आहे. तो 40 वर्षांचा असून एक सराईत चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


अशी करत होता लूट? 

गेल्या काही दिवसांपासून वृद्धांना लुटल्याच्या घटना गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात घडत होत्या. अमजत हा आरोपी प्रत्येक बँकेत जात असे आणि तिथे जर कोणी वृद्ध व्यक्ती दिसली की, पैसे मोजून देतो असे सांगत असे. एकदा का त्याच्यावर कुणी विश्वास टाकून पैसे दिले की तो ते पैसे घेऊन फरार होत असे. त्यामुळे पोलिसांनी बँकाच्या बाहेर गस्त वाढवली होती. 

मंगळवारी गोवंडी येथील एका स्टेट बँकेच्याबाहेर अमजत संशयास्पद फिरत असताना पोलिसांना दिसला. त्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेउन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ पोलिसांना घरफोडीचे सामान देखील मिळून आले. त्याने मुंबईसह ठाणे, नवीमुंबई आणि रायगड परिसरात अशा प्रकारे अनेक वृद्धांना लुटल्याची कबुली देखील दिली आहे.

Loading Comments