महिलांचे अश्लील फोटो बनवून पैसे उकळणारा अटकेत

अनेक तरुणी त्याला चित्रपटात काम मिळावे म्हणून स्वतःच्या माॅडेलिंगचे फोटोही पाठवायचे. तरुणींचे ते फोटो मॉर्फ करून तो अश्लील फोटो बनवायचा. त्यानंतर तो तरुणींना पैशांसाठी ब्लॅकमेल करायचा. पैसे न दिल्यास सोशल मिडियावर ते फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी द्यायचा.

महिलांचे अश्लील फोटो बनवून पैसे उकळणारा अटकेत
SHARES

 मोठ-मोठ्या चित्रपटांमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केल्याचे सांगून महिलांशी जवळीक साधून त्यांच्या फोटोंचा चुकीचा वापर करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत.  सिद्धार्थ सरोदे असे त्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत दोन अभिनेत्रींसह राज्यभरातील आठ महिलांकडून अशा प्रकारे पैसे उकळल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे.


१ लाखांची मागणी

चेंबूरचा रहिवाशी असलेला सरोदे हा फेसबुक आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून माॅडेलशी संपर्क साधायचा. त्यावेळी तो स्वतःची ओळख ही कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगायचा. तरुणींना टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देतो, असे सांगून तो महिलांचा विश्वास संपादन करत असे. चित्रपटात काम करता येईल, या आशेने मोठ्या संख्येने तरुणी त्याच्या संपर्कात आल्या होत्या.

अनेक तरुणी त्याला चित्रपटात काम मिळावे म्हणून स्वतःच्या माॅडेलिंगचे फोटोही पाठवायचे. तरुणींचे ते फोटो मॉर्फ करून तो अश्लील फोटो बनवायचा. त्यानंतर तो तरुणींना पैशांसाठी ब्लॅकमेल करायचा. पैसे न दिल्यास सोशल मिडियावर ते फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी द्यायचा.  अशा प्रकारे सरोदे वांद्रेतील एका माॅडेलला मागील अनेक दिवसांपासून  पैशांसाठी धमकावत होता. याबाबत पीडित तरुणीने गुन्हे शाखेच्या पोलिसाकडे तक्रार नोंदवली होती. या तरुणीजवळ सरोदे  १ लाखाची खंडणी मागत होता.


सापळा रचून अटक

 त्यानुसार गुन्हे शाखा ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सरोदेचा शोध सुरू केला. सरोदे एका व्यक्तीला भेटण्यासाठी चेंबूर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. पोलिस चौकशीत तपासात सरोदेने दोन अभिनेत्रींसह आठ महिलांना अशा प्रकारे खंडणीसाठी धमकावल्याची कबुली दिली. त्यानुसार गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. सरोदेवरया पूर्वी ही बाॅम्बची अफवा पसरवल्या प्रकरणी बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे. 



हेही वाचा -

खंडाळ्याच्या जमीनीसाठी लकडावालाने दिली ११ कोटी ५० लाखांची लाच




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा