शाहरूखकडून अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी


शाहरूखकडून अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी
SHARES

अभिनेता सलमान खानला धमकवल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी शाहरूखला अटक केली. विचारात पडलात ना? पण हा आरोपी अभिनेता शाहरूख नसून उत्तर प्रदेशमधील एका गावातील विकृत शाहरूख गुलाबनबी उर्फ शेरा आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्याला 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


संपूर्ण प्रकार

ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना काही दिवसांपासून निनावी फोन येत होते. समोरील व्यक्ती अभिनेता सलमान खान यांचा नंबर मागत होता. मात्र समोरच्या व्यक्तीला ओळख विचारली असता त्याने स्वत:ची ओळख सांगितली नाही. त्यामुळे सलीम यांनी सलमानच्या जिवाला धोका असून त्याचा नंबर देऊ शकणार नाही, असं सांगून फोन कट केला. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या नंबहून फोन केला. मात्र सलीम यांनी फोन उचलला नाही.


काही दिवसानंतर...

काही दिवसांनी पुन्हा एक निनावी फोन सलीम यांना आला. त्यावर डीआयजी असं ट्रूकॉलरवर लिहून आलं होतं. त्यामुळे सलीम यांनी फोन उचलला असता मी शाहरूख बोलतोय छोटा शकीलचा माणूस असं सांगून त्याने पुन्हा सलमानचा नंबर मागितला. घाबरलेल्या सलीम यांनी याबाबतची माहिती सलमान आणि त्याचा अंगरक्षक शेराला दिली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली असता पोलिसांनी शाहरूख गुलाबनबी याला अटक केली.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा