शाहरुख खानचा ‘मन्नत’ बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीला अखेर अटक

गुरुवारी ६ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षात एक अनोळखी व्यक्तीला फोन आला.

शाहरुख खानचा ‘मन्नत’ बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीला अखेर अटक
SHARES

बॉलिवूड अभिनेता व किंग खान शाहरूख याचा वांद्र्यातील 'मन्नत' बंगला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला शाहरुखचा मन्नत बंगला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी तपास केला असता पोलिसांनी त्या आरोपीला अखेर ४८ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक केली आहे. जितेश ठाकूर असं या व्यक्तीचं नाव आहे. ६ जानेवारी २०२२ रोजी जितेशने फोन करुन ही धमकी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ६ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षात एक अनोळखी व्यक्तीला फोन आला. त्याने शाहरुख खानचा मन्नत बंगला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी दिली. इतकंच नव्हे तर मुंबईत विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट घडवून आणू, अशीही धमकीही दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी तो फोन ट्रेस केला. त्यावेळी हा नंबर मध्य प्रदेशातील जबलपूरचा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी शनिवारी ८ जानेवारीला त्याला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असली तरी त्याच्याकडे काहीही संशयास्पद आढळले नाही. जितेश ठाकूर विरुद्ध धमकावणे आणि सार्वजनिक सेवेला खोटी माहिती देणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा