चायनीज-कॅनेडियन शेफला अटक


चायनीज-कॅनेडियन शेफला अटक
SHARES

अमेरिकेत चायनीज रेस्टॉरन्ट काढण्याच्या नावाखाली सुमारे दोन लाख अमेरिकन डॉलर(एक कोटी चाळीस लाख रुपये) घेऊन वांद्रे येथील प्रसिद्ध रेस्टॉरन्टच्या मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध चायनीज-कॅनेडीयन शेफला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात त्याच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचाः- कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या 'या' रेस्टॉरंट्सवर पालिकेची कारवाई

केल्विन चिंग याला अखेर अटक करण्यात आली आहे. चिंग व त्याचे वडील चिपिंग चिंग यांच्याविरोधात खार पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार रणजीत बिंद्रा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी खार पोलिसांनी भादंवि कलम ४०६, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चिंग हा २०१५ मध्ये बिंद्रा यांच्या रेस्टॉरन्टमध्ये प्रमुख शेफ म्हणून कामाला होता. एका प्रसिद्ध अभिनेत्रीही या हॉटेलमध्ये त्यावेळी चिंगने अमेरिकेत शिकागो व लॉस एन्जलिस(एलए) येथे रेस्टॉरन्ट काढून त्यात गुंतवणूक करण्यास बिंद्राला पैसे गुंतवण्यास सांगितले.

हेही वाचाः- प्रभादेवीमध्ये गॅस गळतीच्या दोन तक्रारी, स्थानिक हादरले

२०१५ मध्ये चिंगच्या वडिलांमार्फत बिंद्राने तेथे दोन लाख अमेरिकन डॉलर गुंतवले. विविध व्यवहारांतर्गत ही रक्कम गुंतवण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. गेल्यावर्षी चिंगचे वडील यांचा मृत्यू झाल्याचे सांगून तो परदेशी गेला. त्यावेळी त्याने नोकरीही सोडली. अनेकवेळा संपर्क साधूनही त्यानंतर कोणताही प्रसिद्ध बिंद्रा यांना मिळाला नाही. त्यानंतर चिंगने त्याला प्रतिसाद देणे बंद केले. नुकतीच चिंग भारतात परतल्याचे बिंद्रा यांना कळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी खार पोलिसांना तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनीही गुन्हा दाखल केला. अखेर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चिंग हा प्रसिद्ध शेफ असून पेज थ्री सर्कलमध्ये सर्व परिचीत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा