"थर्टीफर्स्ट"च्या रात्री पोलिसांचीच बोट बुडाली, १ पोलिस जखमी

मुंबईच्या समुद्रकिनारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईचे सागरी पोलिस लेग बोटींच्या मदतीने समुद्रात ३०० मीटर आत बंदोबस्त करत होते. समुद्रात हेलकावे घेणाऱ्या लांटावरील बोटीचे नियंत्रण न राहिल्यामुळे ही बोट बुडाली.

"थर्टीफर्स्ट"च्या रात्री पोलिसांचीच बोट बुडाली, १ पोलिस जखमी
SHARES

दरवर्षी नववर्षच्या स्वागतासाठी मुंबईच्या समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचीच बोट बुडाल्याची घटना ३१ डिसेंबरच्या रात्री गिरगाव चौपाटीवर घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बोटीवरील ६ पोलिस कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं असून त्यातील १ पोलिस कर्मचारी जखमी असल्याचं कळत आहे.


लाईफ जॅकेटही नव्हतं

बोट बुडाली तेव्हा या बोटीवरील पोलिस कर्मचाऱ्यांकडे लाईफ जॅकेटही नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची आता चौकशी होणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.


बोट कशी बुडाली?

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर मुंबईकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या जल्लोषाला कोणतंही गालबोट लागू नये. यासाठी मुंबईच्या समुद्रकिनारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईचे सागरी पोलिस लेग बोटींच्या मदतीने समुद्रात ३०० मीटर आत बंदोबस्त करत होते. समुद्रात हेलकावे घेणाऱ्या लांटावरील बोटीचे नियंत्रण न राहिल्यामुळे ही बोट बुडाली.


मदतीसाठी धडपड

हा प्रकार जीवरक्षक प्रतीक वाघ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने मदतीसाठी धडपड सुरू केली. पोलिसांच्या इतर पथकाने वेळीच मदत पुरवल्यामुळे जिवीतहानी झाली नाही. प्रतिकने मोठ्या शर्थीने कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं.



हेही वाचा-

थर्टी फर्स्टला ड्रंक अँड ड्राइव्हची संख्या घटली, ७६ तळीरामांवर कारवाई

३० डिसेंबरच्या सायंकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा