Corona virus: कोट्यावधी रुपयांचा मास्कचा साठा जप्त, ५ जणांना अटक


Corona virus: कोट्यावधी रुपयांचा मास्कचा साठा जप्त, ५ जणांना अटक
SHARESकालच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी आणि अंधेरीतल्या एका गोडाउन मध्ये छापेमारी करत जवळपास पंधरा कोटी रुपयांच्या किमतीचे 25 लाख मास्क बेकायदेशीर आता साठवून ठेवल्याप्रकरणी जप्त केलेले होते.या कारवाईची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आणखी एक कारवाई करत एक करोड किमतीचे चार लाख मास्क जप्त केलेले आहेत.

मुंबई पोलिसांच्या विलेपार्ले पोलिसांनी अंधेरीतल्या गोडावून मध्ये छापा टाकून मास्कचे 200 बॉक्स जप्त करून ही कारवाई केलेली आहे यामध्ये एकूण पाच जणांना अटक सुद्धा करण्यात आलीय. मास्क आणि सॅनिटायजर्स या गोष्टींना जीवनावश्यक वस्तू म्हणून समाविष्ट केल्यानंतर बाजारामध्ये त्याची मागणी वाढलेली आहे आणि त्याचा तुटवडा निर्माण होऊ नये ये म्हणून सरकार प्रयत्न करतय मात्र मास्क आणि सॅनिटायजर्स बेकायदेशीर साठवून ठेवल्याच्या घटना समोर येतायत. या  प्रकरणी जक्ता दोन दिवसांमध्ये या कारवाया करण्यात आल्या आहेत आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केलय.

या पूर्वी पोलिसांनी नाहूरमधून तब्बल एक कोटी रुपयांचं सॅनिटायझर साठा जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतून विदेशात पाठवण्यासाठी हँड सॅनिटायझर बनवण्यात येत होते. मात्र त्याचवेळी अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकत कारवाई केली. विशेष हे सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांनी उत्पादनाचा परवानाही घेतला नव्हता. सिद्धिविनायक डायकॅम प्रा.लिमिटेड कंपनीचे नाव या कंपनीचे नाव असून  जग भरात सॅनिटायझरचा दुष्काळ असल्याचा फायदा घेत बक्कळ पैसे कमावण्याचा कंपनीचा प्रयत्न होता. या प्रकरणात अन्य काही जणांना अटक करण्याची शक्यता आहे.हे मास्क आता पालिका आयुक्तांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. हे मास्क पुढे पालिका कर्मचारी, पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांना वाटले जाऊ शकतात.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा