कार चोरांचा पर्दाफाश

मुंबई - गाड्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी अत्यंत चलाखीने पर्दाफाश केला आहे. त्यांची मोडस ऑपरेंडी अत्यंत चकित करणारी आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने या टोळीतील नासिर खान (53) याच्यासह फैज शेख (38) आणि अजिज खान (44) यांना अटक केली आहे. तसंच त्यांच्याकडून टोयोटा, इनोव्हा, तवेरा आणि पाच स्विफ्ट डिजायर यांसारख्या 7 महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत.

ही टोळी चोरी केलेल्या गाड्यांवर भंगारात गेलेल्या गाड्यांचे नंबरप्लेट, चेस्सीप्लेट आणि पेपर वापरून त्यांची विक्री करत होते. त्यांनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे कोणतीही सेकंड हँड गाडी खरेदी करण्यापूर्वी आरटीओकडून त्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Loading Comments