वर्षाच्या पहिल्याच दिवशी सव्वा कोटींचा गुटखा जप्त


वर्षाच्या पहिल्याच दिवशी सव्वा कोटींचा गुटखा जप्त
SHARES

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेने नागपाडा येथे केलेल्या कारवाईत सव्वा कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. विविध कंपन्यांचे गुटख्यांचे पॅकेट या कारवाईत जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आणखी चार आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुर असल्याची माहिती अधिका-याने दिली.

हेही वाचा:-मुंबईतील चार रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात होणार

नागपाडा येथे गुटख्याचा मोठा साठा करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली होती. त्यानुसार नागपाड्यातील छोटा सोनापूर येथील नारीयल गल्ली येथे छापा टाकून मोठ्याप्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला. त्यात रजनीगंधा, नगर गुटखा, राजश्री, किंग विमल, शुद्ध प्लस, हरा गोवा आदी गुटख्यांचे पॅकेट जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी बाबूलाल राम कल्याण वर्मा(४५) व शमसुद्दीन शाहुद्दीन खान(२५) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी चार आरोपींची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा:-मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात

शकील खान, इम्रान, फराउद्दीन शेख व इतर आरोपींची माहिती मिळाली असून त्यांचाही याप्रकरणी सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या त्यांचा शोध सुरू असल्याचे अधिका-याने सांगितले. गुटख्यावर बंदी असल्यामुळे आरोपी चढ्या भावाने त्याची विक्री करत होते. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची काळ्याबाजारात एक कोटी २२लाख २६हजार ३८० रुपये किंमत आहे. राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही सर्रास त्याची विक्री सुरू आहे. काळा बाजारात दुप्पट रक्कम आकारन त्याची विक्री करण्यात येते. एकट्या मुंबईत अवैध गुटख्याची कोट्यावधींची उलाढाल आहे. त्यासाठी छुप्या मार्गाने त्याची तस्करी करण्यात येत आहे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा