मुंबईत विनामास्क फिरल्यास १००० रुपये दंड ही अफवा, मुंबई पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण

मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणारेही सक्रीय झाले आहेत. मुंबईत विनामास्क फिरल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल अशा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे.

मुंबईत विनामास्क फिरल्यास १००० रुपये दंड ही अफवा, मुंबई पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण
SHARES

मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणारेही सक्रीय झाले आहेत. मुंबईत विनामास्क फिरल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल अशा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. मात्र, मुंबई विनामास्क आढळल्यास केवळ २०० दंड आकारला जाईल, असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं की, प्रिय मुंबईकरांनो! फेक न्यूज पसरवणारे परत आले आहेत! यावेळी ते विनामास्क असल्यास तुम्हाला १००० दंड भरावा लागू शकतो असा दावा करत आहेत. मात्र मास्क न वापरल्यास २०० रुपयांचा दंड भरावा लागेल.

लॉकडाऊनबाबत चुकीचे मेसेज, फोटो तयार करु सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. याची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.

अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा